शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

करिअर बदलताना हे लक्षात घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2016 4:51 PM

पुढील काही गोष्टींचा नीट विचार करूनच नव्या क्षेत्रात उडी मारण्याचा निर्णय घ्या.

बॉबी देओल आठवतो? मोठ्या पडद्यावर त्याला पाहून आता बराच काळ झाला आहे. पण सध्या तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलीवूडमध्ये नवी संधी मिळत नाही म्हटल्यवर त्याने नव्या क्षेत्रात नशीब अजमावण्याचे ठरवले. सर्वांना आश्चर्याचा धक्का देत तो ‘डीजे’ झाला. दिल्लीतील एका क्लबमध्ये त्याने शोदेखील केला.पण मदमस्त, ऊर्जाशील संगीतावर थिरकण्यासाठी आलेल्या लोकांसाठी बॉबीने ‘गुप्त’ चित्रपटातील गाणी वाजवली. यामुळे नाराज आणि रागावलेल्या लोकांनी आयोजकांना शोच्या तिकिटाचे पैसे परत देण्याची मागणी केली (?). यातील गंमतीचा भाग सोडला तर यातून आपल्या करिअरविषयी शिकण्यासारखे खूप आहे. शिकत असताना ‘करिअर’ नावाचा शब्द सतत आपल्या मानगुटीवर बसलेला असतो. मोठेपणी काय व्हायचं, कशामध्ये करिअर करायचं, असे हमखास विचारले जाते. दहावी-बारावी नंतर तर ‘करिअर आॅप्शन’ निवडण्याची आपल्यावर जणू काही जबरदस्तीच केली जाते. बरेच जण मग आवडी-निवडी-पॅशन बाजूला ठेवून ठरवून दिलेली, पठडीतील वाटेवर जाण्याची ‘सेफ’ खेळी खेळतात. परंतु जेव्हा निवडलेल्या क्षेत्रात प्रत्यक्षात काम करण्याची वेळ येते तेव्हा न राहून डोक्यात ‘जर...तेव्हा वेगळे करिअर निवडले असते तर’ असे विचार यायला लागतात.काही जण ‘करिअर-स्वीच’ करण्याचा धाडसीपणा करतातदेखील. पण असे करताना आपल्यापैकी प्रत्येक जण यशस्वी होईलच, असे सांगता येत नाही. त्यामुळे पुढील काही गोष्टींचा नीट विचार करूनच नव्या क्षेत्रात उडी मारण्याचा निर्णय घ्या.१. रिसर्च :नव्या क्षेत्रात पाऊल ठेवताना पुरेशी माहिती घेणे अत्यावश्यक असते. केवळ मनात विचार आला म्हणून किंवा एकाकी आलेल्या उर्मीवरून एवढा मोठा निर्णय तडकाफडकी घ्यायचा नसतो. नियोजित क्षेत्राची/कंपनीची आर्थिक स्थिती, त्या क्षेत्रातील आव्हाने, त्यासाठी लागणारी कौशल्ये, कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड, करिअरवृद्धीचे पर्याय असा सारासार विचार करणे गरजेचे आहे. यामध्ये अनुभवी किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे तर अति उत्तम.२. केवळ पैसा नाही :केवळ सध्यापेक्षा जास्त पैसा मिळतोय म्हणून करिअर स्वीच करू नका. अल्पकाळातील फायदा न पाहता लाँग टर्म परिणामांचा विचार करावा. जॉब प्रोफाईल, रँक, जबाबदाºया, अधिकार हे सर्व घटक विचारात घेऊन निर्णय घ्यावा. केवळ पैशासाठी जॉब/करिअर बदलणाºया उमेदवाराला भविष्यात ‘संधीसाधू’ म्हणूनही नाकारले शकते.३. हेतू :क्षेत्र बदलण्याचा आपला प्रामाणिक हेतू आधी तपासून बघा. बरेच जण केवळ सध्याच्या नोकरीमध्ये खूश नाही म्हणून जॉब/कंपनी बदलतात. काही करून त्यांना ‘या’ क्षेत्रापासून दूर जायचे असते. म्हणून मग ते समोर दिसेल/मिळेल त्या संधीचा स्वीकार करतात. पण असे केल्यामुळे करिअरवृद्धीला ब्रेक लागू शकतो.४. स्वत:ची क्षमता :कित्येक लोक स्वत:च्या क्षमतांविषयी अवाजवी अपेक्षा बाळगतात. दुसऱ्या क्षेत्रात गेलो तर आपण अधिक मन लावून काम करू, असे ते स्वत:ला सांगत असतात. परंतु वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण खरंच नव्या जॉबसाठी योग्य आहोत का हे विचारा. निरपेक्षपणे स्वत:चे मूल्यांकन आणि परीक्षणे करा. म्हणजे त्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की, करिअर ट्रॅक बदलण्याची जोखीम स्वीकारावी की नाही.५. धावत्याचे मागे पळू नका :सध्या अमुक-अमुक क्षेत्राचा बोलाबाला आहे किंवा तुमचा मित्र एखाद्या क्षेत्रात चांगला प्रगती करतोय म्हणून करिअर बदलू नका. वर सांगितल्याप्रमाणे तुमची क्षमता, कौशल्य आणि अनुभवाला साजेसे अशाच पर्यायांचा विचार करावा. केवळ अ‍ॅडव्हेंचर म्हणून नव्या क्षेत्रात उडी मारू नका. धावत्याच्या मागे पळणे बरे नाही.हे देखील महत्त्वाचे...नव्या क्षेत्रातील कौशल्ये आणि माहिती मिळवणे पुरेसे नाही. त्यामुळे  सार्वजनिक आणि खासगी जीवनात उद्भवणाऱ्या नव्या आव्हानांचादेखील विचार व्हावा. कदाचित राहते घर बदलावे लागू शकते. पुन्हा पहिल्यापासून सुरूवात करणे अनेकांना अवघड जाते. चोहीबाजूने सर्व घटकांचा शांत डोक्याने अभ्यास केल्यावरच निर्णय घेतला पाहिजे.