सचिनपेक्षा सनीभाईच श्रेष्ठ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:09 AM
सचिन तेंदुलकरने क्रिकेटला जे महान योगदान दिले ते मी नाकारत नाही. मात...
सचिन तेंदुलकरने क्रिकेटला जे महान योगदान दिले ते मी नाकारत नाही. मात्र सचिनच काय जगातील कोणत्याही फलंदाजापेक्षा मला सुनील गावस्कर श्रेष्ठ वाटतो, असे स्पष्ट मत पाकिस्तानचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि सध्याचे आघाडीचे राजकीय नेते इम्रानखान यांनी व्यक्त केले. सनीभाई ज्या पद्धतीचे अजरामर डाव खेळला, तसे सचिनला खेळणे जमले नाही. जगातील सर्वोत्तम चार वेगवान गोलंदाज वेस्ट इंडीज संघात होते, तेव्हा सनी ने निधड्या छातीने या दाहक मार्याचा यशस्वीपणे सामना केला. कारकिदीर्तील आकडेवारी, विक्रम यातून सनीचे योगदान संपूर्णपणे मांडता येऊ शकत नाही. हा एकटा फलंदाज वेगवान गोलंदाजांच्या तोफखान्याचा सामना करायचा तेव्हा मला वाईट वाटायचे. कपिल देवच्या आधीपयर्ंत भारताकडे नाव घेण्यासारखा वेगवान गोलंदाजदेखील नव्हता. वेगवेगळ्या कालखंडातील खेळाडूंची तुलना करणे योग्य नसते, हे मलाही मान्य आहे. सनीला मी श्रेष्ठ मानतो, याचा अर्थ सचिनचा पराक्रम नाकारतो असे नव्हे. इम्रान पुढे म्हणाले, पाकचा लेग स्पिनर अब्दुल कादिर हा शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांच्यापेक्षा सर्वोत्तम स्पिनर होता. तरीही कुंबळे अतिशय उपयोगी गोलंदाज होता. माझ्या ऑल टाईम इलेव्हन संघात कुंबळेला नक्की स्थान देईल.