शाळेतील दमदाटीपासून मुलांना वाचवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:07 AM
कॉलेजमधील रॅगिंगप्रत्येक शाळेमध्ये काही खोडकर मुलं असतात जे इतर मुलांना त्रास देत असतात. याला रॅगिंग असे म्हटले जाते.
शाळेमध्येसुद्धा काही प्रमाणात मुलांना असाच त्रास सहन करावा लागतो. एका अध्ययनानुसार, शाळेत होणार्या या छळाचे परिणाम त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आयुष्यभर दिसून येतात. त्यामुळे जर तुमचे अपत्यही अशा त्रासाला सामोरे जात असेल योग्य वेळीच उपाय करणे फार गरजेच आहे. त्यासाठी या काही महत्त्वाच्या टीप्स.. १. मुलांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवाबर्याचदा मुलं शाळेत होणारा त्रास घरी सांगत नाहीत. त्यामुळे हा प्रॉब्लेम आणखी अवघढ होऊन बसतो. त्यासाठी मुलांच्या वागणुकीवर लक्ष द्या. शारीरिक जखमा, राग करणे, चिडचिड, शाळेला न जाण्यासाठी कारणे सांगणे, अशी काही चिन्हे दिसत असतील त्या कारणांची लगचे चौकशी करा.२. विश्वासात घेऊन सर्व विचारामुलं भीतीमुळे अशा गोष्टी उघडपणे बोलण्यास टाळाटाळ करतात. म्हणून त्यांच्या विश्वास संपादन करून त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. मुळात त्यावरून त्यांना जज करू नये.३. शाळांनी काय करावे?प्रत्येक शाळेची ही नैतिक जबाबदारी आहे की शाळेत असे प्रकार घडू नये. त्यासाठी शाळेत 'अँटी-बुलिंग' प्रोग्राम सुरू करावा. असा काही प्रकार शाळेत घडल्यास तो लगेच शिक्षकांना सांगण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावे.४. शाळेत आरडाओरड करू नकाआपल्या मुलाला त्रास होतोय म्हणून लगेच शाळेत जाऊन आरडाओरड करू नका. शिक्षकांशी, त्रास देणार्या मुलाच्या पालकांशी शांततेने चर्चा करून यावर तोडगा काढा. अशा गोष्टीं फार नाजूक पद्धतीने हाताळाव्या लागतात. मुलांच्या मनावर याचा फार खोलवर परिणाम होत असतो. गरज पडल्यास प्रोफेशनल्सची मदत घ्या.५. मुलांना वेळ द्याआजच्या युगात आर्थिक गणिते सांभाळण्यासाठी आईवडील दोघेही नोकरी करतात. मुलांशी बोलायला, त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांना अनेकदा वेळच मिळत नाही. याचाही परिणाम बालकांच्या मनावर होतो. हे टाळायसाठी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.