दारूमुळे वाढतात महिलांवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:17 AM
दारूचे दूष्परिणाम आपण सर्व जाणतो. परंतु आता यात एक नवी कडी जुळली आहे. एका नव्या अभ्यासातून दारू आणि नशेच्या व्यसनामुळे महिलांवर लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे.
भविष्यात ही समस्या आणखी गंभीर रुप धारण करू शकते, याकडेही या अभ्यासाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. अनेकदा हायप्रोफाईल पार्टीमध्ये दारू प्यायल्यामुळे मुलींना समोरील व्यक्तिबद्दल अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे अशा वेळी हिंसक व्यक्तींबरोबर त्यांचा संबंध येण्याचा धोका संभवतो. अशा व्यक्ती बहुतांशी अनोळखी वयस्क असतात, असे 'बफलो रिसर्च इन्स्टिट्यूट ऑन अँडिक्शन'च्या वरिष्ठ संशोधिका जनेफर लिविंगस्टन यांनी आपल्या संशोधन अहवालात म्हटले आहे. या सर्वेक्षणात १८-२0 वयोगटातील २२८ मुलींच्या दारू व्यसन आणि सेक्शुअल अनुभवांचा अभ्यास करण्यात आला होता.