शॉपिंग म्हटलं की, महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. कारण महिला आपला छंद म्हणून शॉपिंगची आवड जोपासताना दिसतात. परंतु तेच जर पुरूषांबाबत पाहिलं तर त्यांना दुसऱ्यांसाठी सोडा पण स्वतःसाठीही ते मनापासून शॉपिंग करत नाहीत. अनेकदा याबाबत पुरूषांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, जवळपास सर्वच शॉपिंग सेंटर्स आणि दुकानं महिलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत. शॉपिंग करताना प्रत्येक महिलेचा हाच अट्टाहास असतो की, सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं आपल्याकडे असावं. पण पुरूषांबाबत असं दिसून येतं की, त्यांना शॉपिंग करायला आवडतं पण अजिबात वेळ वाया न घालवता. पुरूषांना शॉपिंग करताना मजा येत नाही, तर ते याकडे एक काम म्हणून पाहतात. आज आम्ही पुरूषांसाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे त्यांना अगदी सहजपणे शॉपिंग करणं शक्य होईल...
कोणत्या प्रकारचे कपडे वॉर्डरोबमध्ये असावे?
जेव्हाही तुम्ही शॉपिंग करण्यासाठी जाणार असाल त्यावेळी तुमच्या वॉर्डरोबमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे आहेत आणि कोणते नाहीत याबाबत जाणून घ्या. त्यामुळे तुम्हाला नक्की कोणत्या पॅटर्नटचे कपडे खरेदी करायचे आहेत हे समजणं शक्य होतं. परिणामी शॉपिंग करण्यासाठी लागणारा वेळही वाचतो. तसेच एक्स्ट्रा शॉपिंगपासूनही बचाव होतो. सर्वात आधी हे ठरवा की तुम्हाला ऑफिस वेअरसाठी खरेदी करायची आहे की, कॅज्युअल कपडे खरेदी करायचे आहेत. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल.
शॉपिंगसाठी एक लिस्ट तयार करा
पुरूषांनी शॉपिंगला जाताना लिस्ट तयार करणं ही एक विशिष्ट पद्धत आहे. अनेक दुकानांमध्ये फिरण्यापेक्षा चांगलं आहे की, अशा ठिकाणी जा जिथे तुमच्या गरजेच्या सर्व गोष्टी तुम्हाला सहज मिळतील. जर तुम्ही कपड्यांची शॉपिंग करणार असाल तर लक्षात ठेवा की, तेवढेच कपडे खरेदी करा जेवढे लिस्टमध्ये मेन्शन करण्यात आले आहेत. त्यामुळे जास्त पैसे खर्च होणार नाहीत.
कपडे खरेदी करण्याआधी फिटिंग चेक करा
अनेकदा असं होतं की, आपण घाईगडबडीत साइज चेक न करता कपडे खरेदी करतो. घरी आल्यानंतर जेव्हा ते ट्राय करतो तेव्हा समजतं की, त्यांची फिटींग व्यवस्थित नाही. यापासून बचाव करण्यासाठी थोडा वेळ घ्या पण फिटिंग व्यवस्थित चेक करा.
ऑनलाइन शॉपिंग एक उत्तम पर्याय
पुरूषांसाठी ऑनलाइन शॉपिंग हा एक उत्तम पर्याय आहे. खासकरून त्या लोकांसाठी ज्यांना ट्रेडिशनल शॉपिंग करायला आवडत नाही. ट्रेडिशनल शॉपिंगमध्ये एका दुकानातून बाहेर पडत नाही तर दुसरा दुकानदार त्याच्याकडच्या वस्तू दाखवण्यासाठी तुमच्यामागे लागतो. तसेच मार्केटमधील गर्दीमधून जावं लागतं. यामुळे वेळही खूप वाया जातो. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय बेस्ट ठरतो.