स्मार्टफोन हॅँग होतोय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2017 4:19 PM
आज प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आहे. त्यामाध्यमातून विविध अॅप, गाणी, व्हिडीओ, इंटरनेट आदींचा वापर करुन आनंद घेत असतो. यासाठी आपण डाऊनलोडवर अधिक भर देत असतो. मात्र प्रमाणाच्या बाहेर डाऊनलोड केल्यास हॅँग होण्याची समस्या उद्भवू लागते.
आज प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आहे. त्यामाध्यमातून विविध अॅप, गाणी, व्हिडीओ, इंटरनेट आदींचा वापर करुन आनंद घेत असतो. यासाठी आपण डाऊनलोडवर अधिक भर देत असतो. मात्र प्रमाणाच्या बाहेर डाऊनलोड केल्यास हॅँग होण्याची समस्या उद्भवू लागते. कारण प्रत्येक फोनची अंतर्गत मेमरी (रॅम) व प्रोसेसिंग पावर मर्यादित असते. तुम्ही जर फोनच्या क्षमतेपेक्षा अधिक ताण त्यावर दिला तर फोन हँग होतो. या समस्यापासून सुटका मिळविण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत. * स्मार्टफोनमधील सर्व कुकीज, कॅचे क्लिअर करून सिस्टीम स्वच्छ ठेवा. शिवाय अनावश्यक डाटा डिलीट करून स्पेस वाढविता येऊ शकते. * क्लीन मास्टर किंवा अन्य अप्लिकेशन मॅनेजरद्वारे सर्व अनावश्यक व कामात न येणारे अॅप्स काढून टाका. यामुळे तुमच्या फोनमधील स्पेस वाढून स्पीडही वाढेल.* जर इन्टॉल केलेले अॅप्स इंटर्नल मेमरीमध्ये असतील तर ते अप्लिकेशन एक्स्टर्नल मेमरीमध्ये शिफ्ट करा. यामुळे तुमच्या स्टोरेज स्पेसमधील जागा रिकामी होईल. तुम्ही थेट एक्स्टर्नल मेमरीमध्ये अप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. * कोणतेही अॅप किंवा गेम बंद केल्यानंतर त्यातून पूर्णपणे बाहेर पडा. अनेकजण असे करत नाही आणि ते अप्लिकेशन बॅकग्राउंडमध्ये सुरूच असते. * दररोज लागणाऱ्या फाईल्सच मेमरी कार्डमध्ये स्टोअर करा आणि भविष्यात वापरण्यासाठी निवडलेल्या फाईल्स क्लाऊड स्टोरेजमध्ये सेव्ह करा.* एक्स्टर्नल मेमरीला डिफॉल्ट मेमरी ठेवल्याने सर्व डाटा आपोआप एक्स्टर्नल मेमरीमध्ये सेव्ह होईल. शिवाय फाईल्स, गाणी, व्हिडिओ व बाकी डेटा एक्स्टर्नल मेमरीमध्ये सेव्ह करा.