स्मिता गोंदकरने आईटीएम फूड फेस्टिव्हल मिलांगमध्ये लावली उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 7:09 AM
स्मिता गोंदकर आणि नागेश भोसले यांनी आईटीएम फूड फेस्टिव्हल मिलांगमध्ये नुकतीच उपस्थिती लावली आहे.
पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान असणे फार महत्त्वाचे असते. अनुभव माणसाला यशाच्या शिखरावर बसवतो. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल शिक्षणावर भर देणारी आयटीएम शैक्षणिक संस्थेने यंदा मिलांग २०१८ या फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले. या फेस्टिव्हलमध्ये आयटीएमच्या प्राध्यापकांसमवेत विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. चौकटीबाहेर जाऊन आपली कला सर्वांसमोर दाखवणे हा या फेस्टिव्हल मागील उद्देश होता.या फेस्टिव्हल अंतर्गत आय एच एम चे एकूण २७ स्टॉल होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी बेकरी पदार्थ बनवले होते. आईटीएम आईएचएमच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी मिलांग २०१८ फूड फेस्टिव्हलचे शानदार आयोजन केले होते. फूड फेस्टिव्हल मध्ये विद्यार्थी आणि बाकी मान्यवरांना वेगवेगळ्या खाद्यप्रकारांचा आस्वाद घेता आला. या फूड फेस्टिव्हल मध्ये अभिनेता नागेश भोसले, स्मिता गोंदकर सोबत उद्योगपती प्रशांत ईसार, युनिस्को सदस्य शाम सुगीश या मान्यवरांनी हजेरी लावली. स्मिता आणि नागेशच्या उपस्थितीमुळे विद्यार्थी चांगलेच खूश झाले होते. 'पप्पी दे पारुला' म्हणत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत स्मिताने रसिकांच्या मनात घर केले आहे. सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही स्मिता कायम चर्चेत असते. तिने गडबड गोंधळ, हिप हिप हुर्रे, माझ्या नवऱ्याची बायको, वॉन्टेड बायको नंबर वन, भय असे अनेक चित्रपटदेखील केले आहेत. ‘मिस्टर अॅण्ड मिसेस अनवॉन्टेड’ या चित्रपटात ती एका इव्हेंट मॅनेजरच्या भूमिकेत दिसली होती. तसेच तिने अभिनेता भरत जाधव सोबत सौजन्याची ऐशीतैशी या नाटकामध्ये देखील काम केले होते. तसेच तिचा नई पडोसन २ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नागेश भोसलेने आजवर एक अभिनेता म्हणून अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. एक अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे प्रस्थ निर्माण केले आहे. त्याला आजवर त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Also Read : 'पप्पी दे पारु'चा किलर अंदाज !