शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

SMS DATING RULES: ​आवडणाऱ्या मुलीला व्हॉटस्अ‍ॅप मेसेज करताना या ६ गोष्टी टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2017 8:49 AM

आपल्या आवडत्या मुलीला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज किंवा एसएमएस करताना काही गोष्टींकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा तुमची ‘लव्ह लाईफ’ म्हणजेच ‘प्रेम जीवन’ धोक्यात येऊ शकते. असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून आम्ही सांगत आहोत व्हॉट्सअ‍ॅप डेटिंगचे काही नियम, जे तुम्ही कायम लक्षात ठेवले पाहिजे.

प्रेम आपल्याला स्वप्नावत जगात घेऊन जाते. सगळं कसं एकदम गुलाबी-गुलाबी वाटू लागते. आपल्या आवडणारा मुलगा किंवा मुलीच्या सदैव संपर्कात राहण्यासाठी आपली धडपड सुरू असते. आजकाल स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या मदतीने एकमेकांच्या ‘टच’मध्ये राहणे फारसे अवघड राहिलेले नाही. परंतु आपल्या आवडत्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज किंवा एसएमएस करताना काही गोष्टींकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा तुमची ‘लव्ह लाईफ’ म्हणजेच ‘प्रेम जीवन’ धोक्यात येऊ शकते. ‘व्हॅलेंटाईन डे’ जवळ येत असताना असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून आम्ही सांगता आहोत व्हॉट्सअ‍ॅप डेटिंगचे काही नियम, जे तुम्ही कायम लक्षात ठेवले पाहिजे.१. शॉर्ट फॉर्म इंग्लिश वापरू नकाबऱ्याच जणांना शॉर्ट फॉर्म इंग्लिश लिहिणे ‘कूल’ वाटते. (उदाहरणार्थ, Wt r u doig, w8 4 me,) परंतु यामुळे एक तर तुम्हाला चांगली इंग्रजी येत नाही किंवा तुम्ही आळशी आहात असा संदेश जातो. त्यामुळे शॉर्ट फ ॉर्ममध्ये लिहिणे शक्यतो टाळावे.२. मोठे मोठे ‘विचारी’ मसेज पाठवू नकाआजकाल कोणालाच लांबच्या लांब-मोठे मोठे मेसेज वाचण्यात रस आणि वेळ दोन्ही नाही. त्यामुळे मेसेज शक्यतो लहान आणि स्पष्ट लिहा. एकदा वाचला की, तो समोरच्या व्यक्तीला लगेच कळाला पाहिजे. अन्यथा ते तुम्हाला टाळण्यास किंवा तुमच्या मेसेजकडे दुर्लक्ष करतील.३. रात्री-अपरात्री मेसेज करणे टाळावेजर तुमचे प्रेम नुकतेच बहरले असेल किंवा तुमची मैत्री अजून ‘सुरूवाती’च्या टप्प्यात असेल तर रात्री-अपरात्री मेसेज करणे टाळण्यात शहाणपणा आहे. त्यातुन तुमचा समजुतदारपणा दिसेल. तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या प्रायव्हसी आणि वेळेचे जाण आहे हे कळते.४. ‘सेंड’ करण्यापूर्वी मेसेज वाचाबऱ्याचदा आपण भरभर मेसेज टाईप करून पाठवून देतो आणि मग तो वाचतो. अशावेळी जर काही चुक झाली तर आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे ‘सेंड’ करण्याची घाई करू नका. आधी व्यवस्थित वाचा, ज्याला पाठवायचा आहे त्याचा नंबर बरोबर आहे का हे तपासा आणि मगच पाठवा. नाही तर नंतर ५० मेसेज करून स्पष्टीकरण द्यावे लागेल.५. चॅटिंगवर अति वैयक्तिक प्रश्न विचारू नकाएकमेकांना जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटणे कधीही उत्तम. उगीच फोन-चॅटिंगवर ‘पर्सनल’ होण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे मेसेजमध्ये जास्त वैयक्तिक प्रश्न किंवा ज्यामुळे तुमचा प्रियकर/प्रेयस ‘आॅकवर्ड’ होईल असे प्रश्न विचारू नका विचारू नका. दुसऱ्यांची अशी खासगी माहिती इकडे-तिकडे पसरू न देण्यासाठी अशी पर्सनल चॅट डिलीट लगेच डिलीट करावी.६. धडाधड मेसेजसचा सपाटा नका लावूएका मागून एक असे धडाधड मेसेज पाठवून समोरच्यास हैराण करू नका. मेसेज पाठवल्यावर समोरच्यास रिप्लाय देण्यासाठी थोडा वेळ द्या. रिप्लायला उशीर होत असेल तर विचार करा की, ते कदाचित कोणत्या तरी कामा व्यस्त असतील. लगेच जाब विचारल्या सारखे मसेज पाठवू नका.