- नेहा चढ्ढासोनम कपूर स्टाईल आयकॉन आहेच, त्यात यंदा कान्स महोत्सवातही तिच्या फॅशनचे जलवे होतेच. एकाच वेळी बोल्ड, मॉडर्न आणि ट्रॅडिशनल असणं तिला कसं जमतं याचं भल्याभल्यांना आश्चर्य वाटतं. यंदाही तिनं तेच केलं. तिच्या निळ्या रंगाच्या ट्राऊझर साडीनं अनेक फॅशन पंडितांना चकित केलं. तिचे ते फोटो तिच्या स्टायलिस्ट रेहानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. त्यानं इंटरनेट ब्रेक केलं. ती ट्राऊझर साडी मसाबा गुप्तानं डिझाइन केली होती. अशा साऱ्या बातम्या एव्हाना तुमच्यापर्यंतही आल्या असतीलच.आता मूळ प्रश्न असा आहे की अशा पद्धतीची ट्राऊझर साडी फॅशनेबल महिला तरी नेसू शकतात का?तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी हे ही लक्षात घ्यायला हवं की यापूर्वीही एकदा सोनमने डेनीस साडी नेसली होती. म्हणजे जिन्सवाल्या डेनिम कपड्याची साडी.ती साडी तिनं उत्तम कॉन्फिडण्टली कॅरीही केली.याशिवाय गेल्या काही दिवसात तिनं नेसलेली धोती स्टाईल साडी, जॅकेट स्टाईल साडी, डबल पल्लू साडी यांचेही देखणे फोटो इंटरनेटवर व्हायरल झालेच.
ते तिला कसं जमतं?तर त्याचं उत्तर एकच, तिचा कॉन्फिडन्स.ती जे करते ते पूर्ण विश्वासानं करते.साडी नावाचा हा ट्रॅडिशनल पोषाख. मात्र त्याला मॉडर्न टच देता येवू शकतो, विविध प्रकारे साडी नेसता येवू शकते हेच त्यातून दिसतं आहे.आता मुद्दा हा की, या साड्या आम महिलांना नेसता येवू शकतात का?त्याचं उत्तर हे की, तशा पद्धतीनं आणि आपल्याला झेपेल, चांगलं दिसेल असं काही ट्राय करायचं असेल तर मदतीला इंटरनेट आहे.