शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ गाणं जुनं आहे. पण मोराची नक्षी असलेला ड्रेस , साडी, पैठणी, शालू प्रत्येकीलाच हवा आहे अगदी आजही !

By admin | Published: June 01, 2017 6:50 PM

साडीबरोबरच कुर्ती,ड्रेस, ओढणी, सलवार अशा कोणत्याही ट्रॅडिशनल, सेमीट्रॅडिशनल कपड्यांवर मोराची नक्षी छान दिसते

- मोहिनी घारपुरे-देशमुखपावसाळा सुरू होण्याचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत. पाऊस पडायला लागल्यावर मोर पिसारा फुलवून थुईथुई नाचतो. तसेच फॅशनच्या जगतातही डिझायनर्सना मोर खुणावू लागतो. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा असं म्हणत म्हणत साड्या, शालू, पैठणी साऱ्याजणी मोराच्या नक्षीकामानं अधिकाधिक सुंदर दिसू लागतात.खरंच, फॅशनच्या जगात पारंपरिक पद्धतीच्या साड्या आणि ड्रेसेसवर मोराची डिझाईन नेहमीच इन असते. आणि ती सदैव इन राहिल यात शंका नाही.

 

     

मोराच्या सौंदर्याचे इतके प्रचंड प्रकार कपड्यांवर दिसतात की विचारता सोय नाही. साडीबरोबरच कुर्ती, ओढणी, सलवार अशा कोणत्याही ट्रॅडिशनल, सेमीट्रॅडिशनल कपड्यांवर मोराची नक्षी हमखास आढळते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोर तोच असला तरी प्रत्येक कपड्यावर त्याचं रूप, रंग निरनिराळं दिसतं. किंबहुना मोराच्या डिझाईनच्या दोन कपड्यांवरील डिझाईन अगदी समसमान असं सापडणं तसं विरळाच. कधी पिसारा फुलवलेला तर कधी फांदीवर बसलेला मोर, कधी आपल्या लांडोरीसोबत एकाच फांदीवर बसून तिच्याकडे बघणारा मोर तर कधी वारली चित्रातील चॉकलेटी, काळ्या पार्श्व रंगावर आपला तोरा दाखवत पिसारा फुलवलेला पांढरा मोर, अशा या मोराच्या हजारो तऱ्हा . कपड्यावर मोराच्या नक्षीचा डौल इतका सुंदर, सुबक दिसतो की पाहणाऱ्याला तो घ्यावासा वाटतो आणि विकणाऱ्याला चांगला दामही मिळतो.

 

                  विशेषत: पैठणी खुलते ती या जरतारीच्या रंगीबेरंगी मोरामुळे. तर कुर्ती खुलतात वारली चित्रांतील मोरांच्या तोऱ्यामुळे. सोनेरी चंदेरी जर लावून मोराच्या नक्षीला वेगळाच उठाव दिलेला असतो. त्याचबरोबर निळ्या हिरव्या रंगातच नव्हे तर कपड्याच्या रंगावर जो रंग खुलून दिसेल त्याप्रमाणे रंगांची निवड करून मोराला नटवलं जातं आणि तसे रंगीबेरंगी मोरही अनेक कपड्यांवर फारच शोभून दिसतात. फॅशनच्या जगतात, पाश्चात्य कपड्यांवर जरी मोर फारसा आढळला नाही तरी खास भारतीय धाटणीच्या कपड्यांवर मात्र मोराच्या सौंदर्यपूर्ण नक्षीला तोड नाही हेच खरे...तुमच्याही वॉर्डरोबमध्ये एखादी तरी साडी मोरांच्या नक्षीची असणारच ! आहे ना ?