कहाणी हर शहर की!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2016 4:00 PM
शहरांची नावेच झाली चित्रपटाचे शिर्षक चित्रपटांना दिल्या जाणाºया नावावरून त्या चित्रपटाचा आधार काय असेल याची कल्पना येते. ही फार जुनी पद्धत आहे. शहरांच्या नावावर आधारित चित्रपट असतील तर ती त्या शहराची कथा असेल यात शंकाच नाही. मात्र असे नाव असलेल्या प्रत्येक चित्रपटातून तुमची इच्छा पूर्ण होईल याची शक्यता कमी आहे.
शहरांची नावेच झाली चित्रपटाचे शिर्षक चित्रपटांना दिल्या जाणाºया नावावरून त्या चित्रपटाचा आधार काय असेल याची कल्पना येते. ही फार जुनी पद्धत आहे. शहरांच्या नावावर आधारित चित्रपट असतील तर ती त्या शहराची कथा असेल यात शंकाच नाही. मात्र असे नाव असलेल्या प्रत्येक चित्रपटातून तुमची इच्छा पूर्ण होईल याची शक्यता कमी आहे. १२ आॅगस्टला आषुतोष गोवारीकर दिग्दर्शित हृतिक रोशन व पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मोहेंजोदडो’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘मोहेंजोदडो’चा शब्दश: अर्थ मृतांची टेकडी असा होतो. ५००० वर्षांपूर्वीची नागरी संस्कृती दर्शविण्यासाठी निर्मात्यानी बरीच मेहनत केली असल्याचे चित्रपटाचा ट्रेलर पाहून दिसते. शहरांवर आधारित व त्या शहराची संस्कृती दाखविणारे बॉलिवूडमधील चित्रपटांची यादी सीएनएक्सच्या वाचकांसाठी...सलाम बॉम्बे (१९८८) मीरा नायर दिग्दर्शित सलाम बॉम्बेला विदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी आॅस्करचे नामांकन मिळाले होते. देशातील सर्व महत्त्वाच्या पुरस्कारावर सलाम बॉम्बेने आपली मोहर उमटविली. या चित्रपटातील कलाकार मुंबईतील स्ट्रीट चिल्ड्रन होते. त्यांना कार्यशाळेत अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. सलाम बॉम्बेला कान्स चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन कॅमेरा पुरस्कार’ देण्यात आला होता. बॉम्बे (१९९५) १९९३ साली मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक मणिरत्नम यांनी ‘बॉम्बे’ चित्रपटाची निर्मिती केली. अरविंद स्वामी व मनीषा कोईराला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याचा जोरदार विरोध करण्यात आला होता. बॉम्बे हा चित्रपट बॉलिवूडमधला चर्चित चित्रपटापैकी एक असण्यामागील त्याची पार्श्वभूमी जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच त्याचे चित्रीकरण देखील सुरेख आहे. मणिरत्नम यांनी या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली आहे.हैदराबाद ब्लूस (१९९८) दिग्दर्शक नागेश कुक्नूर अभिनित या चित्रपटात हैदराबाद शहरातील आयटी उद्योगामुळे बदलणारे जीवनमान दाखविण्यात आले आहे. एनआरआय असलेला वरुण नायडू सुट्यांंमध्ये हैदराबादेत येतो. चित्रपटातील लहान लहान घटनांमधून त्यावेळच्या प्रसंगावर ‘कॉमिक कमेंट्स’ करण्यात नागेश यशस्वी ठरला आहे. जुने व नवे हैदराबाद पाहताना तेथील जीवनशैली दिसते. या चित्रपटाचा सिक्वल प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाची आजही चर्चा केली जाते. कलकत्ता मेल (२००३) कलकत्ता ते मुंबई असा प्रवास हा चित्रपट पूर्ण करतो. हा थ्रिलरपट असला तरी दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी कलकत्ता शहराचे बारकावे टिपले आहेत. अनिल कपूर, राणी मुखर्जी, मनीषा कोईराला, सौरभ शुक्ला, सतीश कौशिक यांच्या भूमिका या कलाकृतीला वास्तव्याशी जोडण्याचा प्रयत्न करतात. बॉक्स आॅफिसवरही हा चित्रपट अपयशी ठरला नाही. चित्रपटाने शेवटच्या दिवसांत पैसा कमविला. न्यूयॉर्क (२००९) कबीर खान दिग्दर्शित न्यूयॉर्क हा चित्रपट अमेरिकेवरील ९/११ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. जॉन अब्राहम, नील नितीन मुकेश, कॅटरिना कैफ व इरफान खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘न्यूयॉर्क’मधून भारतातून अमेरिकेत आलेला समीर व न्यू यॉर्क शहरात राहणारे माया व उमर या तीन मित्रांची कथा दाखविण्यात आली आहे. न्यूयॉर्क शहराचे सौंदर्य टिपण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने ६० कोटींची कमाई केली. लंडन ड्रिम्स (२००९) सलमान खान, अजय देवगण, आसीन यांच्या प्रमुख भूमिका असलेला लंडन ड्रिम्स या चित्रपटातून मैत्री, संगीत व प्रेम यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा लंडनच्या भोवतीच गुंफण्यात आल्याने लंडनचे सौंदर्य प्रेक्षकांना पाहता येते. बॉक्स आॅफिसवर सलमानची जादू चालली अन् चित्रपटाने २००९ साली १३० कोटींची कमाई केली. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर व रणविजय यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. दिल्ली ६ (२००९) केश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित दिल्ली ६ हा चित्रपट दिल्लीच्या चांदनी चौक भागात घडणाºया लहान लहान घटनांवर आधारित हा चित्रपट मानवी भावनांना स्पर्श करतो. अभिनयाच्या बाबतीत सर्वच कलावंत उजवे ठरतात. चित्रपटात अनेक चरित्र आहेत जे दिल्लीबद्दल माहिती आपल्या पद्धतीने देताना दिसतात. समीक्षकांनी चित्रपटाबददल संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. बॉक्स आॅफिसवर दिल्ली ६ सुपर हिटच्या श्रेणीत नसला तरी त्याची कथा लोकांना आवडली. राकेश ओमप्रकाश मेहराचा टच ही चित्रपटाची जमेची बाजू. गँग आॅफ वासेपूर (२०१२) झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यात वासेपूर नावाचे गाव असल्याचे चित्रपटातून सांगण्यात येते. हा चित्रपट बिहारच्या गुन्हेगारीवर तयार करण्यात आलेला सर्वाधिक चर्चित चित्रपट मानला जातो. अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनात मनोज वाजपेयी व नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा अभिनय चित्रपटाला नव्या उंचीवर घेऊन जातो. बिहार-झारखंडमधील कोल माफियाच्या भोवती गुंफण्यात आलेल्या कथेत दोन कुटुंबातील वैमनस्य दाखविण्यात आले आहे. बॉक्स आॅिफसवर चित्रपटा बजेटच्या चारपट कमाई केली. या चित्रपटाचा सिक्वल प्रदर्शित करण्यात आला होता. देहरादून डायरी (२०१३) ध्ययन सुमन, रागिणी नंदवानी, रती अग्नीहोत्री यांच्या भूमिका असलेला देहरादून डायरी हा चित्रपट रहस्यपट आहे. दिग्दर्शक मिलिंद उके यांनी रहस्यपटाची पाश्वभूमी डेहरादूनसारखे शहर ठरविल्याने येथील सौंदर्य दाखविण्यात कोणतीही कंषूशी केली नाही. डेहारादूनचे प्रसिद्ध कॉलेजपासून ते आसपासचे निसर्गसौंदर्य व रस्त्यांचे चित्रीकरणामुळे चित्रपटाला जिंवतपणा येतो. मात्र हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर काही खास करू शकला नाही. बॉम्बे वेल्वेट (२०१५) दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या बॉम्बे वेल्वेट या चित्रपटात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, केके मेनन, करण जोहर यासारख्या दिग्गज कलावंतांच्या भूमिका होत्या. १९६० च्या कालखंडात मुंबई शहरात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणारा जॉनीची ही कथा आहे. १९६० साली असलेले मुंबईचे रूप दाखविण्यासाठी निर्मात्याने मोठा खर्च केला. त्यात ते यशस्वी झाले असे म्हणता येईल. मात्र प्रेक्षकांनी बॉम्बे वेल्वेटकडे पाठ फिरविली. बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट सपशेल अपयशी ठरला.