शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

​उबदार कपड्यांनी बना स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2016 5:56 PM

हिवाळा ऋतू सुरु झाला असून, थंडीचे प्रमाणही वाढले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण हिवाळ्यातील थंडीपासून बचावासाठी विविध प्रकारचे उबदार कपडे परिधान करीत असतात.

-Ravindra Moreहिवाळा ऋतू सुरु झाला असून, थंडीचे प्रमाणही वाढले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण हिवाळ्यातील थंडीपासून बचावासाठी विविध प्रकारचे उबदार कपडे परिधान करीत असतात. बऱ्याचदा आपल्या व्यक्तिमत्त्वाला सूट न होणारे कपडे निवडले जातात आणि आपल्या सौंदर्यात बाधा येते. पूर्वी थंडीपासून बचाव करण्यासाठी ‘स्वेटर’ हा एकमेव उपाय होता. आता त्यात अनेक फॅशनेबल पर्याय उपलब्ध आहेत. आजच्या सदरात फॅशनेबल दिसण्यासाठी कोणत्या उबदार कपड्यांची निवड करायची याबाबत जाणून घेऊया...डिसेंबर ते फेबु्रवारी दरम्यान बरेच दिवस हवेत सुखद गारवा आणि मस्त गुलाबी थंडी असते. या बोचणाऱ्या थंडीची दखल उबदार कपड्यांच्या बाजारपेठेने घेतली आहे. या बाजारपेठेत कमी ऊब देणारे परंतु फॅशनेबल कपडे बाजारात उपलब्ध आहेत. नैसर्गिक गारठ्यापेक्षा कॉर्पोरेट विश्वातील वातानुकूलित कक्षात वावरताना अशा कपड्यांचा खूप उपयोग होतो..थंडीच्या दिवसात इच्छा नसतानाही शाळा-महाविद्यालय, नोकरी यानिमित्ताने पहाटे घराबाहेर पडावेच लागते. अशावेळी उबदार कपड्यांची आवश्यकता असते. अनेकजण याच काळात बाजारात, रस्त्यावर दुकान मांडून बसलेल्या तिबेटीयन अथवा नेपाळी विक्रेत्यांकडून स्वेटर्स विकत घेतात. त्याचप्रमाणे शोरूम्समधील ब्रॅण्डेड उबदार कपडेही खरेदी केले जातात. आपापल्या कुवतीनुसार, ऐपतीनुसार त्यापैकी योग्य दुकानावर आपली नजर स्थिरावते आणि आवडीनुसार जॅकेट्स विकत घेतली जातात. वॉर्म जॅकेट्स, टी-शर्ट, शॉल आदींचे अनेक प्रकार आपल्याला स्ट्रीट मार्केटमध्ये पाहायला मिळतात. सध्या बाजारात अनेक प्रकारचे कोट आणि जॅकेट्स उपलब्ध आहेत. या दोन्ही प्रकारांत अनेक पर्याय उपलब्ध असल्याने निवड करताना संभ्रमात पडायला होते. कोणत्या ग्राहकाला कोणते जॅकेट प्राधान्याने दाखवावे, हा प्रश्न विक्रेत्यासमोर नेहमीच उभा राहतो. जॅकेट निवडीच्या वेळी होणारा संभ्रम टाळायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. शहरातील बहुतांश भागात नेपाळी, तिबेटीयन तसेच स्थानिक स्वेटर्स विक्रेते रस्त्यावर रंगीबेरंगी स्वेटर्सचा ढीग मांडून बसतात. त्यांना पाहिले की ऋतू बदलाची जाणीव होते. मेघालय, पंजाब, नेपाळ येथील माल ते विक्रीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आणतात. सुमारे ५०० ते हजार रुपयांपर्यंतचे विविध प्रकारांतील स्वेटर्स त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यात लोकरीच्या स्वेटरपासून जर्कीन, जॅकेट, कानटोपी, लहान मुलांचे स्वेटर्स असे ऊबदार कपडे विक्रीसाठी असतात.पी जॅकेट / पायलेट जॅकेटयालाच पी कोट असेही म्हणतात. हे साधारणत: नेव्ही ब्लू रंगामध्ये पाहावयास मिळते. पी जॅकेट परिधान केल्यानंतर मनुष्याचा लूक राजेशाही थाटासारखाच दिसतो. विशेषत: याला लांब बाह्या असतात. तर त्याची कॉलर रुंद असते. पी कोटचा आकार त्याच्या डिझाईननुसार बदलतो. पुरुष आणि महिला या दोघांसाठी पी कोट उपलब्ध आहेत. सुरुवातीला युरोपातील खलाशी नंतर काही कालावधीनंतर अमेरिकन खलाशी याचा वापर करीत होते. बहुरंगी वुलन टी-शर्टसबाह्य वातावरणात थंडीचा गारवा आणि कंपनींच्या कार्यालयात वातानुकूलन यंत्रणा यामुळे हुडहुडी भरविणाऱ्या थंडीच्या बचावासाठी वुलन टी-शर्टसना चांगली पसंती मिळते. यात ग्राहकांच्या मागणीनुसार बाजारात बहुरंगी टी-शर्टस बाजारात उपलब्ध आहेत. अशा प्रकारचे टी-शर्ट एक प्रकारचे स्वेटरच असतात. मात्र यामध्ये स्वेटर्सच्या तुलनेत कमी ऊब मिळते.  उबदार पार्का कोटहिवाळ्यात थंडीचे प्रमाण जास्त असेल तर पार्का कोट्सला पसंती दिली जाते. कारण यापासून इतरांपेक्षा सर्वाधिक उब मिळते. पार्का कोट्स लांबीला मांडीपर्यंत येतात तर याला लांब बाह्या असतात. त्यामुळेच आपल्या शरीराचा बहुतेक भाग या जॅकेटमुळे झाकला जातो. पार्का कोट्सला पुढच्या बाजूला झिप असते आणि मागच्या बाजूला हूड (डोक्यासाठी टोपी) असते, त्यामुळे या जॅकेट्सला तरुणाईची विशेष पसंती मिळताना दिसते.  लेदर जॅकेट्सकित्येक वषार्पासून तरुणाईला वेड लावणारे लेदर जॅकेट्सची क्रेझ तेवढ्याच प्रमाणात आजही पाहावयास मिळते. कित्येक हिंदी चित्रपटांमध्ये बॉलिवूड कलाकारांनी जॅकेट्स वापरले आहे. साहजिकच याचे अनुकरण तरुण मंडळी करतात. भरपूर खिसे, स्ट्रेट किंवा फिटेड कट, विविध प्रकारच्या कॉलर्स अशा विविध वैशिट्यांमुळे हे जॅकेट्स परिधान केल्यानंतर प्रत्येकाचा लूक फॅशनेबल बनतो, हे नक्की