शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

‘स्टायलिश’ उन्हाळ्याचे फंडे

By admin | Published: April 08, 2017 3:33 AM

मुंबईसह राज्याचा पारा ४५ अंशावर गेला आहे. सर्वत्र उन्हाचा कडाका आहे

रामेश्वर जगदाळे,मुंबई- मुंबईसह राज्याचा पारा ४५ अंशावर गेला आहे. सर्वत्र उन्हाचा कडाका आहे. या परिस्थितीमध्ये घराबाहेर पडताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत ज्यामुळे आपले घराबाहेरही उन्हापासून रक्षण होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? या तर मग जाणून घेऊ या..आई माझे कॉटनचे शर्ट कुठे आहे? आज जीन्स नको, शॉर्ट्स बरी आहे... असे संवाद घराघरांत सध्या ऐकायला मिळत आहेत. उन्हापासून विसावा मिळावा म्हणून आपण काय काय नाही करत? शीतपेय, आइसक्रीम, नारळपाणी, नाक्यावरचा बर्फाचा गोळा अगदी चवीने खातो. परंतु आपल्या आयुष्यातील मूलभूत गरज मात्र विसरतो. वाढत्या तापमानाचा अंदाज घेता आपल्या कपड्यांबाबतच्या सवयींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. सध्या बाजारामध्ये उन्हाळ्यासाठी खास असे कपडे आले आहेत. घराबाहेर पडताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत याबाबतीत घेतलेला हा आढावा..खादी शर्ट व सदरा.. तरुण मुला-मुलींपासून ते वयोवृद्धदेखील या वस्त्राचे कपडे घालू शकतात. दिसण्यास रेखीव व उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी या कपड्यांचा वापर होतो. बाजारामध्ये या शर्ट व सदऱ्याची किंमत ४०० ते ८०० पर्यंत आहे.कॉटन सदरा...या कुर्तामधून हवा खेळती राहते. त्याचप्रमाणे हा कुर्ता तुम्ही समारंभ व इतर ठिकाणी घालू शकता.. मुली स्टायलिश दिसण्यासाठी या कुर्ताचा वापर करतात. यामध्ये प्रिंटेड व प्लेनसुद्धा उपलब्ध आहेत. याची किंमत ५०० ते १००० पर्यंत आहे.गुंजी : उन्हाळ्यात बाहेर फिरण्याचे प्लॅन होत असतात त्या वेळी याचा तुम्हाला वापर होऊ शकतो. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही बदलही करू शकता.. कॉटनपासून याची निर्मिती होत असल्याने उन्हापासून तुमचे संरक्षण होऊ शकते. याची किंमत ५०० ते ७०० पर्यंत आहे.टॉप-धोती फ्युजन...टॉप व धोती याचं हे संयोजन आहे. बाजारामध्ये विविध रंग व प्रकारांत उपलब्ध आहे. याची किंमत बाजारात ६०० ते १२००पर्यंत आहे.फ्लेअर पँट्स...बेल बॉटम असा याचा पायजमा आहे. काळानुसार लुप्त झालेला हा प्रकार नव्याने बाजारात आला आहे. दिसण्यास आकर्षक व मॉडर्न टच देऊन त्याची निर्मिती करण्यात आली आहे. बाजारात याची किंमत ५०० ते ७०० आहे.

लाईफस्टाल संबंधित बातम्या वाचण्यासाठी- http://www.lokmat.com/lifestyle-1