नाविण्याचा शोध घेणारा कलावंत - सुबोध भावे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2016 4:52 AM
गेल्या दशक भरात पन्नासहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांमधून भूमिका साकारणारा सुबोध भावे मराठी चित्रपटसृष्टीत नवा अध्याय लिहू पाहत आहेत.
गेल्या दशक भरात पन्नासहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांमधून भूमिका साकारणारा सुबोध भावे मराठी चित्रपटसृष्टीत नवा अध्याय लिहू पाहत आहेत. त्याच्या बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि कट्यार काळजात घुसली या चित्रपटांनी आपल्या मराठी इंडस्ट्रीला बॉक्स आॅफिसवर अच्छे दिन दाखविले आहेत. सुबोध भावे जेव्हा कुठलंही काम हाती घेतो, तेव्हा ते कुणाला तरी काही दाखवून देण्यासाठी नव्हे तर त्याला ते काम मनापासून आवडतं म्हणून. त्यामुळेच तो जे काही करतो, ते सर्वाेत्तम असतं. याची प्रचिती कट्यारच्या निमित्ताने सर्वांनाच आली. कट्यार काळजात घुसली बॉक्स आॅफिसवर तुफान चालला. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता सुबोेध भावे असाच नाविण्याचा ध्यास घेत आपल्यासाठी या पुढेही काहीतरी नवीन घेऊन येईल आणि त्याच्या मुळे आपल्या मराठी इंडस्ट्रीला अनेक प्रतिभावंत गायक, अभिनेते लाभतील अशी अपेक्षा आहे. या मोठ्या मनाच्या मोठ्या कलावंतास आमच्या खूप खूप शुभेच्छा.