शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

उन्हाळ्याचे ‘स्टायलिश’ फंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2017 3:16 PM

मुंबईसह राज्याचा पारा ४५ अंशावर गेला आहे. सर्वत्र उन्हाचा कडाका आहे. या परिस्थितीमध्ये घराबाहेर पडताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत

 रामेश्वर जगदाळे,

 
मुंबई- मुंबईसह राज्याचा पारा ४५ अंशावर गेला आहे. सर्वत्र उन्हाचा कडाका आहे. या परिस्थितीमध्ये घराबाहेर पडताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत ज्यामुळे आपले घराबाहेरही उन्हापासून रक्षण होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? या तर मग जाणून घेऊ या..
 
आई माझे कॉटनचे शर्ट कुठे आहे? आज जीन्स नको, शॉर्ट्स बरी आहे... असे संवाद घराघरांत सध्या ऐकायला मिळत आहेत. उन्हापासून विसावा मिळावा म्हणून आपण काय काय नाही करत? शीतपेय, आइसक्रीम, नारळपाणी, नाक्यावरचा बर्फाचा गोळा अगदी चवीने खातो. परंतु आपल्या आयुष्यातील मूलभूत गरज मात्र विसरतो. वाढत्या तापमानाचा अंदाज घेता आपल्या कपड्यांबाबतच्या सवयींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. सध्या बाजारामध्ये उन्हाळ्यासाठी खास असे कपडे आले आहेत. घराबाहेर पडताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत याबाबतीत घेतलेला हा आढावा...
लाइफस्टाइल संबंधित आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा- http://www.lokmat.com/lifestyle-1
 
खादी शर्ट व सदरा...
तरुण मुला-मुलींपासून ते वयोवृद्धदेखील या वस्त्राचे कपडे घालू शकतात. दिसण्यास रेखीव व उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी या कपड्यांचा वापर होतो. बाजारामध्ये या शर्ट व सदऱ्याची किंमत ४०० ते ८०० पर्यंत आहे.
 
कॉटन सदरा...
या कुर्तामधून हवा खेळती राहते. त्याचप्रमाणे हा कुर्ता तुम्ही समारंभ व इतर ठिकाणी घालू शकता.. मुली स्टायलिश दिसण्यासाठी या कुर्ताचा वापर करतात. यामध्ये प्रिंटेड व प्लेनसुद्धा उपलब्ध आहेत. याची किंमत ५०० ते १००० पर्यंत आहे.
 
गुंजी...
उन्हाळ्यात बाहेर फिरण्याचे प्लॅन होत असतात त्या वेळी याचा तुम्हाला वापर होऊ शकतो. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही बदलही करू शकता.. कॉटनपासून याची निर्मिती होत असल्याने उन्हापासून तुमचे संरक्षण होऊ शकते. याची किंमत ५०० ते ७०० पर्यंत आहे.
 
टॉप-धोती फ्युजन...
टॉप व धोती याचं हे संयोजन आहे. बाजारामध्ये विविध रंग व प्रकारांत उपलब्ध आहे. याची किंमत बाजारात ६०० ते १२००पर्यंत आहे.
फ्लेअर पँट्स...
बेल बॉटम असा याचा पायजमा आहे. काळानुसार लुप्त झालेला हा प्रकार नव्याने बाजारात आला आहे. दिसण्यास आकर्षक व मॉडर्न टच देऊन त्याची निर्मिती करण्यात आली आहे. बाजारात याची किंमत ५०० ते ७०० आहे.