व्हॉटस्अॅपवर काही तासांचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2016 4:54 PM
ब्राझीलमध्ये एका न्यायाधिशाने व्हॉटस्अॅप सुविधा निलंबित करण्याचे निर्देश दिले आणि देशातील दहा कोटी यूजर्सना याचा फटका बसला.
मेसेजिंग अॅप व्हॉटस्अॅपविरोधा वातावरण तापलेले दिसत आहे. ब्राझीलमध्ये एका न्यायाधिशाने व्हॉटस्अॅप सुविधा निलंबित करण्याचे निर्देश दिले आणि देशातील दहा कोटी यूजर्सना याचा फटका बसला. गुन्ह्याच्या तपासात गरजेचे माहिती देण्यास कंपनीने असर्मर्थता दर्शविल्यावर निलंबनाचा निर्णय घेण्यात आला.मात्र, सुप्रिम कोर्ट न्यायधिश रिकार्डो लेवॅन्डोवस्की यांनी काही तासांतच हे निलंबन उठवले आणि कोट्यवधी यूजर्सच्या जीवात जीव आला. अशा प्रकारचा निर्णय देण्याची गजर नसल्याचे लेवॅन्डोवस्की म्हटले. ‘व्हॉटस्अॅपचे निलंबन हे मुलभूत अभिव्यक्ती आणि संवाद स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. परिणामांचा पुरेसा विचार न करता दिलेला हा निर्णय असल्यामुळे आम्ही निलंबन मागे घेत आहोत’, असे ते म्हणाले.तत्पूर्वी न्यायधिश डॅनिएला बार्बोसा यांनी एका गुन्ह्याच्या तपासाअंतर्गत महत्त्वाची माहिती देण्यास व्हॉटस्अॅपची मालक कंपनी ‘फेसबुक’ अपयशी ठरल्यावर असा निर्णय घेतला. फेसबुक तर्फे सांगण्यात आले की, विचारण्यात आलेली माहिती आमच्याकडे मुळात उपलब्धच नाही. त्यामुळे ती देण्यास आम्ही असमर्थ आहोत.यापूर्वीदेखील व्हॉटसअॅपच्या ‘डेटा इनक्रिप्शन’मुळे अनेक वाद निर्माण झालेले आहेत. या सेवेतून केलेला मेसेज केवळ पाठवणारा आणि ज्याला पाठवला तो असे दोघेच पाहू शकतात. अशा प्रकारची सुविधा सुरक्षायंत्रणांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे.