शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

​पावसाळ्यात घ्या सायकलिंगचा मनमुराद आनंद! ​

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2016 1:16 PM

रंगबिरंगे जॅकेट अन् सायकलवर स्वार झालेले हे हेल्मेटधारी वीर आपल्या धुंदीत, निसर्गवेडात रमण्यासाठी सज्ज असतात. सायकलिंग हादेखील एक अनोखा छंदच म्हणावा लागेल. आनंदात जगण्याची मजा लुटायची, आपल्याच नादात, धुंदीत वावरायचे असा ‘लाइफ फंडा’ आजची तरुणाई यूज करताना दिसतेय.

पावसाळा व तरुणाई यांचे अतुट नाते आहे. यातच श्रावनाचा महिना डोंगर कड्यावर सायकल रायडिंगची मज्जा काही औरच असते. निसर्गदर्शनाबरोबर सांस्कृतिक अभ्यास करण्याचा हेतू साधण्याच्या प्रयत्नात असणाºया या बाइकर्सना आता ‘अ‍ॅडव्हेंचर टुरिंग’ची भुरळ पडत असल्याचे दिसते. आॅगस्ट महिन्यात बºयाचा सुट्या असल्याने याचा भरपूर लाभ घेण्यासाठी शहरातील हौशी मंडळी तयार झाली आहे. शहारात आतापासूनच रस्त्याच्या कडेने शिस्तबद्धपणे एका मागून एक नव्या बानावटीच्या सायकल्सवर तरुणाई जाताना दिसून लागली असल्याचे चित्र आहे. रंगबिरंगे जॅकेट अन् सायकलवर स्वार झालेले हे हेल्मेटधारी वीर आपल्या धुंदीत, निसर्गवेडात रमण्यासाठी सज्ज असतात. सायकलिंग हादेखील एक अनोखा छंदच म्हणावा लागेल. आनंदात जगण्याची मजा लुटायची, आपल्याच नादात, धुंदीत वावरायचे असा ‘लाइफ फंडा’ आजची तरुणाई यूज करताना दिसतेय. सायकलिंगचा थाट बदललापूर्वी सायकल चालवण्याचा एक वेगळाच थाट असायचा. परंतु मोटरसायकलने जीवनात शिरकाव केला नि सायकल मागे पडू लागली. पण तीच सायकल पुन्हा ताठ मानेने आयुष्यात आली ती फिजिकली फिटनेसमुळेच. आता सायकल चालवणं हा एक छंद असला तरी तिच्याही कम्युनिटीज आहेत.  पूर्वी सायकल सगळेच वाहन म्हणून  वापरत असत. एखादी कंपनी सुटली की किमान १०० सायकलींचा ताफा एकत्र बाहेर पडत असे. काळ बदलला व सध्या सायकल ही फिटनेस इन्स्ट्रूमेण्ट झाली. आताच्या मोटर बाईकच्या काळात काही हौशी सायकल रायडर्स क म्युनिटीज तयार झाल्याने सायकल चालविण्याचा मजा घेता येतो. सायकलचा रोमंचक प्रवास वाहनांमध्ये जशी टेक्नॉलॉजी आली, तशी सायकल ही अत्याधुनिक झाली. आता सायकल फक्त जवळच्या पल्ल्यासाठी किंवा गरीब माणसाचे वाहन उरलेली नाही. अनेकांची हौस आणि मौजेची वस्तूही बनली आहे. वेगवेगळ्या वापरासाठी वेगवेगळे डिझाइन, जाडे, दणकट, बारीक, हलके, बुटके, उंच अशा सर्व प्रकारच्या विशिष्ट धातूंत बनवलेल्या फ्रेम्स व त्याचप्रमाणे त्यांचे टायर बनू लागले. सायकल चालवण्यास सोपी व्हावी म्हणून त्यात गेअरची सुविधा देण्यात आली आहे. ७ गेअर ते २४ गेअर्सच्या सायकली अगदी कॉमन झाल्या. सध्या या सायकली घेऊन कुणी डोंगरात आॅफरोडिंग करायला जातो, तर कोणी लाँग ड्राइव्हला, उंच डोंगरात आॅफरोडिंग किंवा १००-१५० किलोमीटर लाँग स्ट्रेच सायकलिंग या अत्याधुनिक सायकलींमुळे खूपच सोपे झाले आहे .कम्युननिटीज आल्यातसायकल  केवळ लहान मुलांना खेळण्यासाठी राहिली. आॅफिसमध्ये जाण्या-येण्यासाठी बाईक्सचा वापर वाढला. यातच फिटनेससाठी सायकल उत्तम साधन असल्याचे सांगण्यात आल्याने अचानक सायकलची एक नवी क्रेझ निर्माण झाली. यातूनच हौसी सायकल चालकांच्या कम्युनिटी तयार झाल्या. दर सुट्टीच्या दिवशी ही लोक २५-५० च्या ग्रुपमध्ये सायकलिंग करायला बाहेर पडू लागले. महागड्या सायकल व महागडे अक्सेसरी लावून ही मंडळी सॉलिड मजा करतात. या सायकलिंग हौसेमध्ये मजा व फिजिकल फिटनेस दोन्ही गोष्टीं पूर्ण होत असल्याने सायकलिंग करण्याची हौस वाढली आहे. मान्सून सायकलिंगचा आनंद सायकल रायडर्समध्ये मान्सून सिजन अत्यंत फे मस आहे. पहिला पाऊस पडल्यावर सर्वत्र पसरलेली हिरवळ, झाडांवर बहरलेली नवी पालवी व थंड वातावरण याचा अनुभव घेण्यासाठी सायकल रायडर्स या मोसमात खास स्वारीवर निघतात. बहुतेक सर्व मोठ्या शहरातील सायकल रायडर्स कम्युनिटी अशा प्रकारचे नवीन उपक्रम राबवितात. जंगलातून जाणाºया रस्त्यामधून प्रवास करताना मिळणार आनंद अनुभवने सायकल रायडर्सचे आवडते डेस्टीनेशन झाले आहे. सायकलिंगला जाताना घ्या काळजी - सेफ्टी गिअरर्समध्ये हेल्मेट, ग्लोज, जॅकेट, रायडिंग पँट, रायडिंग शूज वापरावेत - या सोबतच टॉर्चकॅप, दिशानिर्देशक, प्रथमोपचार पेटी व ग्लुकोझ सोबत ठेवा- लांब राईडवर जाताना पंक्चर किट, स्काला (एकमेकांशी संपर्क करण्यासाठीचे यंत्र) - डिस्पोझेबल बॅग, दोरी याशिवाय खाण्या पिण्याचे साहित्य असू द्या.