TECH ALERT : रात्री स्मार्टफोनचा वापर केल्यास होतात ‘हे’ धोके !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 11:08 AM
स्मार्टफोन जरी आयुष्याचा अविभाज्य घटक बनला असला तरी स्मार्टफोनच्या वापराने अनेक समस्याही निर्माण होताना दिसत आहेत.
स्मार्टफोन जरी आयुष्याचा अविभाज्य घटक बनला असला तरी स्मार्टफोनच्या वापराने अनेक समस्याही निर्माण होताना दिसत आहेत. स्मार्टफोनच्या अति वापराचा परिणाम आरोग्यावर होत असल्याचे संशोधनात स्पष्ट होत असल्याने स्मार्टफोन वापरण्याचे काही नियमावलीही बाहेर येत आहे. ‘युसीएलए स्कूल आॅफ मेडिसिन’च्या डॉक्टरांनी तर रात्री स्मार्टफोनचा वापर केल्याने आरोग्यावर खूप दुष्परिणाम होतात असे जाहीर केले आहे, यासाठी कमीत कमी रात्री झोपण्याच्या एक तास अगोदर मोबाइल फोन आपल्यापासून दूर ठेवला पाहिजे, असाही सल्ला त्यांनी दिला आहे.जाणून घेऊया की, रात्री स्मार्टफोनचा वापर केल्यास काय दुष्परिणाम होतात ते.* अतिरिक्त वजन वाढतेरात्री स्मार्टफोनचा वापर केल्यास त्याचा झोपेवर परिणाम होतो. याचाच परिणाम मेटाबॉलिजम प्रक्रि येवर होऊन अतिरिक्त वजन वाढते.* मेंदूत थकवा जाणवतो दिवसभराची धावपळ, त्यातच रात्रीच्या वेळी स्मार्र्टफोनचा वापर केल्यास मेंदूत थकवा जाणवतो. याचाच परिणाम आपल्या दैनंदिन कामांवर होऊन कामातील समस्याही वाढतात. * स्मरणशक्तीवर परिणामरात्री स्मार्टफोनचा वापर केल्यास स्मरणशक्तीवर परिणाम स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता वाढते.* डोळ्यांवर विपरित परिणामरात्री स्मार्टफोनचा वापर केल्यास डोळ्यांवर अतिरिक्त ताण पडतो, यामुळे डोळ्यांचे आरोग्य खराब होते शिवाय डोळे कमजोरही होतात. * झोपेवर परिणामरात्री फोन जवळ घेऊन झोपल्याने अचानक येणारे मॅसेज, नोटिफिकेशन किंवा कॉल यामुळे झोपमोड होते. पुरेशा झोपेअभावी सकाळी आळस येतो आणि याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होता. * लक्ष विचलित होतेरात्री स्मार्टफोन वापरल्याने एकाग्रता कमी होते, त्यामुळे कु ठल्याही कामावर लक्ष लागत नाही. शिवाय ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. Also Read : Health Alert : ‘नोमोफोबिया’..एक स्मार्टफोनचं व्यसन !