TECH : फोन चार्ज करताना ‘या’ 7 गोष्टी फॉलो करा, अन्यथा होइल नुकसान !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2017 12:36 PM
फोनला चार्ज करतेवेळी काही गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण असतात, त्या गोष्टी फॉलो केल्या नाही तर बॅटरीचे लाइफ तर कमी होते शिवाय परफॉर्मस्देखील कमी होते.
आज स्मार्टफोन सर्वचजण वापरत आहेत. फोनच्या वापराने डिस्चार्ज झालेली बॅटरी पुन्हा चार्ज करावी लागते. विशेषत: फोनला चार्ज करतेवेळी काही गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण असतात, त्या गोष्टी फॉलो केल्या नाही तर बॅटरीचे लाइफ तर कमी होते शिवाय परफॉर्मस्देखील कमी होते. आम्ही आपणास काही टिप्स देत असून ज्या बॅटरी चार्ज करताना सर्वांना माहित असणे आवश्यक आहेत.* रात्रभर चार्ज नकोरात्रभर चार्ज केल्यास ओव्हर चार्जिंग होऊन बॅटरी खराब होऊ शकते. * कंपनीच्याच चार्जरचा वापर करावामोबाइल घेतेवेळी जे चार्जर सोबत आले आहे म्हणजे कंपनीचेच चार्जर वापरावे. अन्य चार्जर वापरु नये. जर ओरिजनल चार्जर नसेल तर असेच चार्जर वापरा ज्याची रेटिंग ओरिजनल चार्जरसारखी असेल.* पॉवर बॅँकशी कनेक्ट असताना वापर टाळावाजेव्हा पॉवर बॅँक कनेक्ट क रुन चार्ज करीत असाल तेव्हा फोनचा वापर टाळावा. अशाने फोनचे इंटरनल टेंप्रचर वाढते आणि बॅटरीचे लाइफ कमी होते. * चार्ज करतेवेळी फोनला लावलेले जादाचे कव्हर काढाकधीही फोन चार्ज करीत असाल तर फोनला लावलेले जादाचे कव्हर काढूनच चार्ज करावे. या कव्हरमुळे बॅटरीचे तापमान अधिक वाढते. * सतत फास्ट चार्जरचा वापर नकोसतत फास्ट चार्जरचा वापर केल्यास हाय होल्टेज बॅटरीत जातात, ज्यामुळे बॅटरीचे तापमान वेगाने वाढते. * कमीत कमी ८० टक्कयापर्यंतच चार्ज कराबॅटरीच्या उत्तम आयुष्यासाठी कमीत कमी ८० टक्कयापर्यंतच चार्ज करा. प्रत्येकवेळी १०० टक्के चार्ज नकोच.* वारंवार चार्ज नकोवारंवार चार्ज केल्यास बॅटरीचे आयुष्य कमी होते. २० टक्कयावर बॅटरी आल्यास तेव्हाच चार्जिंगला लावा.Also Read : TECH : स्मार्टफोनच्या चार्जिंगचा वेग दुपटीने वाढविण्यासाठी खास टिप्स ! TECH KNOW : ...म्हणून खराब होते स्मार्टफोनची बॅटरी !