TECH : आपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्याचे ‘व्हॉट्सअॅप’ असे करा सुरु !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2017 12:03 PM
व्हॉट्सअॅपच्या सिक्यूरिटी प्रणालीमुळे आपण इतरांचे व्हॉट्सअॅपवरील मॅसेज पाहू शकत नाही. पण अशा काही ट्रिक्स आहेत ज्याद्वारे आपण आपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्याचे व्हॉट्सअॅप सुरु करु शकतो.
-Ravindra Moreसोशल मीडियामध्ये आज व्हॉट्सअॅपची क्रेझ सर्वांपेक्षा जास्त आहे. प्रत्येकजण व्हॉट्सअॅपने एकमेकांशी जोडले गेले आहेत. मात्र बऱ्याचदा आपला जवळचा मित्र किं वा मैत्रिण व्हॉट्सअॅपने इतरांशी चॅटिंग करतात तेव्हा आपल्या मनात ते काय चॅटिंग करीत आहेत याबाबत जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. मात्र व्हॉट्सअॅपच्या सिक्यूरिटी प्रणालीमुळे आपण इतरांचे व्हॉट्सअॅपवरील मॅसेज पाहू शकत नाही. पण अशा काही ट्रिक्स आहेत ज्याद्वारे आपण आपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्याचे व्हॉट्सअॅप सुरु करु शकतो. * सर्वप्रथम ‘WhatsScan for Whatsapp’ हे ८.३७ एमबीचे अॅप आपल्या फोनमध्ये डाऊललोड करून इन्स्टॉल करा.* आपल्या मोबाइलमध्ये हे अॅप ओपन केल्यावर ‘English’ भाषेची निवडा करा. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारले जाईल तो तुमच्या पसंतीचा टाका.* यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये क्यूआर कोड येईल. ज्याचे व्हॉट्सअॅप तुम्हाला उघडायचे आहे, त्याच्या फोनमधील ‘व्हॉट्सअॅप’ ओपन करावे.* उजव्या बाजूच्या तीन ठिब दिसतील, त्यावर क्लिक करुन ‘whatsapp web’ निवडावे. त्या ठिकाणी येणाऱ्या कोडने आपल्या मोबाइल मधील कोडला स्कॅन करावे. * कोड स्कॅन करताच दुसऱ्याचे व्हॉट्सअॅप तुमच्या फोनमध्ये सुरू होईल.* ज्याचे व्हॉट्सअॅप तुम्ही उघडले आहे त्याचे सर्व मॅसेजेस तुम्ही वाचू शकाल.या व्हॉट्सअॅपवरील त्या व्यक्तीच्या चॅट लिस्टमधील लोकांसोबत तुम्ही चॅट करू शकता. * यानंतर अकाउंट लॉगआउट करायचे असल्यास अॅपच्या मेनू बारमध्ये जाऊन तुम्ही लॉगआउट करू शकता.Also Read : TECH : आता व्हॉट्स अॅपद्वारे मित्रांवर ठेवा नजर !