TECH : व्हॉट्स अॅपवर नवीन इमोजींचा समावेश !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2017 12:36 PM
फेसबुकच्या माध्यमाने यात आता काही नवीन इमोजींची भर पडणार आहे. व्हॉट्स अॅपची २.१७.४४ ही आवृत्ती नुकतीच बीटा यूजर्ससाठी सादर करण्यात आली आहे.
-Ravindra Moreनवीन व्यवसाय आणि लिंग समानता याला प्राधान्य देत व्हॉट्स अॅपने आपल्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये नवीन इमोजींचा समावेश केला आहे. विविध सोशल साइट्सवर इमोजी या आधुनिक युगातल्या संदेश वहनाचा अविभाज्य घटक आहेत. व्हॉटसअॅपवरही आपण याचा मुक्तपणे वापर करत असतो. फेसबुकच्या माध्यमाने यात आता काही नवीन इमोजींची भर पडणार आहे. व्हॉट्स अॅपची २.१७.४४ ही आवृत्ती नुकतीच बीटा यूजर्ससाठी सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात नवीन इमोजींचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात नवीन व्यवसाय आणि लिंग समानता या विषयाला डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने आयओएस १०.२ आणि अँड्रॉइड नोगट ७.१ या आॅपरेटींग सिस्टीम्समधील इमोजींचा समावेश करण्यात आला आहे. अर्थात आपल्या स्मार्टफोनमध्ये संबंधीत प्रणालीचा वापर नसतांनाही आपण त्या इमोजी वापरू शकू. नवीन आवृत्तीत डॉक्टर, शास्त्रज्ञ, आरोग्य सेवक, शेतकरी, गायक, पॉपस्टार, तंत्रज्ञ, शेफ, कारखान्यातील कामगार, गायक, मेकॅनिक आदींचा समावेश असेल. लिंग समानता दर्शविण्यासाठी यात संबंधीत महिला व्यावसायिकांच्या इमोजीदेखील देण्यात येणार आहे. अर्थात आपण महिला डॉक्टरसह अन्य महिला इमोजींचा वापरदेखील करू शकणार आहे.