Tech : ‘फेस स्वॅप’ अॅपची कमाल लई भारी !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2017 11:29 AM
कोणत्याही दृष्यांसोबत आपला फोटो चिकटवून त्याची आकर्षकता वाढावी, यासाठी मायक्रोसॉफ्टने ‘फेस स्वॅप’ अॅप नुकतेच लॉन्च केले आहे.
वेगवेगळ्या गोष्टी किंवा कोणत्याही दृष्यांसोबत आपला फोटो चिकटवून त्याची आकर्षकता वाढावी, यासाठी मायक्रोसॉफ्टने ‘फेस स्वॅप’ अॅप नुकतेच लॉन्च केले आहे. हे अॅप वापरण्यासाठी तुम्हाला आपला सेल्फी काढावा लागेल. त्यानंतर फेस स्वॅप तुमचा चेहरा वेगळा करून देईल. हा चेहरा उपलब्ध फोटोंपैकी कोणत्याही फोटोवर तुम्ही चिकटवू शकता. मायक्रोसॉफ्टच्या बिंग इमेज सर्च इंजिनचा वापर करून फेस स्वॅप वेगवेगळ्या व्यक्ती जसे फॅशन मॉडेल किंवा अंतराळवीरांच्या फोटोवर तुमचा फोटो चिकटवते. फेस स्वॅप सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला उपलब्ध फोटो न वापरता दुसरा फोटो हवा असेल तर सर्च बार वापरून तुम्ही इंटरनेटवरून फोटो घेऊन त्यावर आपला चेहरा लावू शकता. हे फोटो तुम्ही सेव्ह व शेअर करू शकता. Also Read : TECH : आपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्याचे ‘व्हॉट्सअॅप’ असे करा सुरु !