Tech : आता फेसबुकच्या अल्बममध्ये टाका फोटोंसह व्हिडिओ आणि पोस्ट !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2017 11:47 AM
फेसबुकने आपल्या युजर्ससाठी एक नवीन सुविधा सुरु केली असून त्यात अल्बममध्ये आता आपण फक्त प्रतिमाच नव्हे तर व्हिडिओ, पोस्ट तसेच ‘चेक इन्स’ आदी बाबीदेखील टाकू शकतो.
फेसबुकने आपल्या युजर्ससाठी एक नवीन सुविधा सुरु केली असून त्यात अल्बममध्ये आता आपण फक्त प्रतिमाच नव्हे तर व्हिडिओ, पोस्ट तसेच ‘चेक इन्स’ आदी बाबीदेखील टाकू शकतो. फेसबुकच्या अल्बममध्ये आपर आतापर्यंत विविध फोटो टाकू न त्याला सजवत होतो. मात्र आता फेसबुकने अल्बमला प्रतिमांच्या पलीकडे नेण्याच्या हालचाली सुरू केल्या असनू या अनुषंगाने आता युजर्सला यात फोटोंसोबत व्हिडिओ, टेक्स्ट पोस्ट आणि त्याने केलेल्या ‘चेक इन्स’बाबतची माहितीदेखील टाकता येणार आहे. विशेष म्हणजे संबंधीत युजरचे मित्र त्याच्या एखाद्या अल्बमला ‘फॉलो’देखील करू शकतील. याचे त्यांना नोटिफिकेशन्सही मिळतील. तसेच आपण फॉलो करत असलेल्या अल्बमचे नोटिफिकेशन्स आॅफ करण्याची सुविधाही यात असेल. त्या युजरला एखाद्या कार्यक्रमाचा अल्बम तयार करावयाचा असल्यास तो आपल्या मित्रांना यात सहभागीदेखील करू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आता कोणताही युजर आपला एक अल्बम ‘फिचर्ड’ या स्वरूपात ठेवू शकतो. हा फिचर्ड अल्बम त्याच्या प्रोफाईलवर ठळकपणे दिसणार आहे. सध्या हे अपडेट फेसबुकच्या वेब आणि अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्सला प्रदान करण्यात आले असून ते लवकरच आयओएस प्रणालीसाठीही सादर करण्यात येणार आहे.Also Read : TECH : फेसबुक मॅसेंजरवर ग्रुप पेमेंटची सुविधा येणार ! : आपण फेसबुकवरुन अद्यापही ‘या’ ७ गोष्टी हटविल्या नाहीत का?