शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

TECH : व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये पहा व्हिडीओ आणि फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2017 1:10 PM

व्हॉट्सअॅपच्या बोरिंग स्टेटसला करा बाय बाय, त्यात आता पहा व्हिडीओ आणि फोटो !

सोशल मीडिया युजर्समध्ये लोकप्रिय असलेलं मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने गतवर्षी अनेक नवे फिचर्स आणले आहेत. यावर्षीदेखील व्हॉट्सअॅपने एक नवीन बदल केला असून यामुळे काय स्टेटस टाकू? असा प्रश्न पडणा-या युजर्सना या नव्या फिचरचा फायदा होणार आहे. व्हॉट्सअॅप स्टेटस फिचरमध्ये बदल करत असून यामुळे युजर्सना स्टेटसमध्ये फक्त टेक्स्ट न टाकता फोटो, व्हिडीओ आणि GIF टाकणं शक्य होणार आहे.   सध्या व्हॉट्सअॅपमध्ये 'Hey there, I'm using WhatsApp' हा डिफॉल्ट स्टेटस उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपवर एकतर तुम्ही उपलब्ध असलेल्यांपैकी एखादा स्टेटस ठेवू शकता, किंवा तुमच्या भावना लिहून त्या टेक्स्ट स्वरुपात ठेवू शकता. जास्तीत जास्त त्यात स्माईली वापरुन स्टेटस आकर्षक करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण आता या कंटाळवाण्या आणि रटाळ स्टेटसपासून सुटका मिळेले. खासकरुन ज्यांना वारंवार आपला स्टेटस बदलायचा असतो त्यांच्यासाठी तर हे खूपच मनोरंजक असणार आहे.  या नव्या फिचरमुळे व्हॉट्सअॅप स्टेसमध्ये टेक्स्टच्या ऐवजी एक छोटा व्हिडीओ टाकणं शक्य होणार आहे. सध्या ही सोय किंवा फिचर इंस्टाग्रामवर (Instagram Stories) उपलब्ध असून स्नॅपचॅटशी मिळतं जुळतं आहे. आता व्हॉट्सअॅपवर फोटो, व्हिडीओ, GIF शेअर करणं शक्य होणार असून सर्वजण ते पाहू शकतात. विशेष म्हणजे आपल्या स्टेटसवर मित्र कमेंट करु शकतात, जे फक्त आपल्यालाच दिसणार. मित्रांची कमेंट चॅटच्या माध्यमातून आपल्याल येईल, त्यावेळी त्याने कोणत्या स्टेटसवर कमेंट केली आहे हेदेखील पाहायला मिळेल. हे व्हॉट्सअॅप स्टेटस 24 तासानंतर आपोआप गायब होईल.     स्टेटस अपडेट करण्यासाठी मेन्यूत जाण्याची गरज राहणार नसून चॅट्स आणि कॉल्समध्ये त्यासाठी वेगळा पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे. डिफॉल्ट सेटिंगनुसार आपले सर्व मित्र स्टेटस पाहू शकतात. पण जर काही ठराविक लोकांनाच तो दिसावा असं वाटत असेल तर तेही शक्य आहे. तसंच आपला स्टेटस कोणी वाचला हेदेखील पाहू शकतो. त्याचप्रमाणे गेल्या 24 तासांत मित्राने कोणते स्टेटस ठेवले होते हेदखील कळू शकतं. पण आपण ते डिलीट केल्यास मित्रांना ते पाहता येणार नाही.  व्हॉट्सअॅपने हे फिचर युरोपमध्ये सुरु केलं असून इतर देशांमध्ये लवकरच सुरु करणार आहे. लवकरच हे फिचर अॅड्रॉईड, आयफोन आणि विंडोज युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.