TECH : लॅपटॉपच्या ‘या’ आयताकृती स्लॉटचा काय आहे उपयोग?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2017 9:41 AM
एक छोटा आयताकृती स्लॉट किंवा छेद देखील लॅपटॉपला असतो. बऱ्याचजणांना या स्लॉटचा काय उपयोग होतो हे माहित नसेल. चला जाणून घेऊया या स्लॉटच्या उपयोगाबाबत.
-Ravindra Moreबहुतेकांकडे लॅपटॉप असेलच. लॅपटॉपला व्यवस्थित पाहिले तर त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे स्लॉट आपणास दिसतील. त्यात इंटरनेट कनेक्शन, युएसबी आदींसाठी वेगवेगळे स्लॉट लॅपटॉपला असतात. मात्र एक छोटा आयताकृती स्लॉट किंवा छेद देखील लॅपटॉपला असतो. काही लॅपटॉपच्या चार्जिंग पॉर्इंट जवळ तर काही लॅपटॉच्या युएसबीच्या पोर्टजवळ हा पॉर्इंट असतो. बऱ्याचजणांना या स्लॉटचा काय उपयोग होतो हे माहित नसेल. चला जाणून घेऊया या स्लॉटच्या उपयोगाबाबत. विशेषत: हा स्लॉट लॅपटॉपच्या सुरक्षिततेसाठी म्हणजेच चोरी होऊ नये म्हणून दिलेला असतो. ‘लॅपटॉप लॉक’ या स्लॉटमध्ये जोडायचे असते. त्यासाठी लॅपटॉप लॉकला मोठी वायरदेखील असते. याद्वारे आपण साखळीने एखादी वस्तू बांधून ठेवतो तशाच प्रकारे लॅपटॉपही एखाद्या वस्तूला जखडून ठेऊ शकता. पण हे लॉक अद्यावत तंत्रज्ञानानेयुक्त आहे. एक युनिक पासवर्डद्वारे तुमचा लॅपटॉप या लॉकमध्ये जखडला जातो. यासाठी लॅपटॉपच्या आतमध्ये तशी गुंतागुतीची प्रणाली तयार करण्यात आली असते. जोपर्यंत अचूक पासवर्ड टाकला जात नाही तोपर्यंत हे टाळे उघडता येणं अशक्य आहे . त्यामुळे, लॅपटॉपची चोरी करण्याचा प्रश्नच येत नाही. साधारण २००० नंतर आलेल्या लॅपटॉपमध्ये ही प्रणाली पाहायला मिळेल. लॅपटॉपची चोरी होऊ नये म्हणून देण्यात येणारा हा आयताकृती स्लॉट ‘के स्लॉट’ म्हणूनही ओळखला जातो. Also Read : संगणकातील F1 ते F12 या key चा काय आहे उपयोग !