-Ravindra Moreमुलींना टेडी बेअर खूपच आवडतात. यामुळेच व्हॅलेंटाईन वीकच्या ‘टेडी डे’ ला आपल्या स्वीटहार्टला एक चांगला गोंडस टेडी गिफ्ट द्यायला विसरू नका.कपल टेडी बेअर्सजर आपण आपल्या नात्याच्या बाबतीत गंभीरतेने विचार करीत असाल आणि नात्याला पुढे वाढवायचे असेल तर यावेळी ‘टेडी डे’ ला आपल्या पार्टनरला कपल टेडी गिफ्ट करा. यामुळे आपला पार्टनर सहज आपल्या भावना समजू शकेल आणि आपणासही आपल्या मनातील भावना सांगायला सोपे होईल. अलार्म टेडी बेअरजर आपण आपल्या मनातील गोष्ट सांगायला घाबरत असाल तर आपल्या पार्टनरला अलार्म टेडी बेअर गिफ्ट करा. हा असा टेडी बेअर आहे जो हातात पकडल्यावर लगेच ‘आय लव्ह यू’ बोलतो आणि हे आपण हातातून सोडत नाही किंवा स्वीच आॅफ करीत नाही तोपर्यंत बोलतच राहतो. आपणही आपल्या पार्टनरच्या हातात हे टेडी बेअर द्या आणि स्वीच आॅन करा, आपल्या मनातील गोष्ट टेडी बोलेल.हाइट टेडी बनवाजर आपणास खूपच रोमॅँटिक पद्धतीने ‘टेडी डे’ सेलिब्रेट करायचा असेल तर आपल्या पार्टनरला त्याच्या उंचीच्या बरोबरीचा टेडी गिफ्ट द्या. आपण या टेडीला तिच्या घरी कुरिअरने पाठवा आणि सोबतच ‘जेव्हाही तुला माझी आठवण येईल तेव्हा या टेडी सोबत गप्पा मार, कारण या टेडीच्या स्वरुपात मी तुझ्याजवळ असेन..’ असा एक प्रेमाचा रोमँटिक संदेशही द्यायला विसरु नका. यामुळे आपला पार्टनर नक्कीच इंप्रेस होईल. आपल्या आवडीचा टेडी बनवाआपण रेडीमेड टेडी खरेदी करण्याऐवजी एक चांगला सुंदर टेडी स्वत: बनवा. या टेडीवर आपण आपण आपल्या मनासारखी डिझाइन आणि विविध रंगाचादेखील वापर करु शकता. त्याची उंची आपल्या इच्छेप्रमाणे बनवू शकता आणि त्यात आपण आपल्या मर्जीप्रमाणे रेकॉर्डेड अलार्म लावू शकता. टेडी बेअर केकजर आपल्या पार्टनरला टेडी बेअरपेक्षा थोडे वेगळे काही देऊ इच्छिता तर टेडी बेअर शेपचा एक चांगला चॉकलेट केक देऊ शकता. या केकवर चारही बाजूने ‘आय लव्ह यू’ लिहा. यामुळे आपला पार्टनर इंप्रेस झाल्याशिवाय राहणार नाही. ड्यूअल हार्ट शेप टेडीआपल्या पार्टनरला अधिक इम्प्रेस करण्यासाठी हार्ट शेप टेडी बेअर देऊ शकता. सध्या मार्केटमध्ये खूपच सुंदर हार्ट शेप टेडी बेअर उपलब्ध आहेत. ज्यावर खूपच रोमॅँटिक मेसेजही लिहिलेले असतात. एवढेच नव्हे तर, ज्यात दोन ह्रदय आपसात गुंतलेले असतील असा ड्यूअल हार्ट शेप टेडी बेअरदेखील देऊ शकता. याद्वारे आपण आपले दोघांचे ह्रदय एकमेकांजवळ आहे, अशा भावना आपल्या पार्टनरपर्यंत पोहोचू शकता. लवबर्ड डिझाइनर टेडीसध्या लवबर्ड्स डिझाइनर टेडी बेअर बाजारात खूपच उपलब्ध आहेत जे पाहताना खूपच आकर्षक वाटतात. याप्रकारचे टेडी बेअर देऊन आपल्या पार्टनरला आपल्या चांगल्या आठवणी देऊ शकता. विशेष म्हणजे असे डिझायनर टेडी बेअर हे प्रेम व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. टॉय, कार्ड आणि फोटो स्टाइल टेडी बेअरआपण आपल्या पार्टनरला टॉय किंवा कार्डच्या स्टाइलमध्ये बनलेले टेडी बेअर देऊ शकता. सध्या टॉय शेपमध्ये कित्येक प्रकारचे टेडी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सोबतच कार्ड लावलेले टेडीदेखील आहेत. आपण आपल्या पार्टनरचा आणि स्वत:चा फोटो लावू शकाल असेही काही टेडी पार्टनरला देऊन इंप्रेस करू शकता. * टेडी घेताना या गोष्टींकडे लक्ष द्या* टेडी बेअर खरेदी करताना आपण आपल्या पार्टनरच्या भावना लक्षात घ्या.* एवढेच नव्हे, तर खूपच सॉफ्ट असेल असाच टेडी घ्या. हार्ड टेडी नकोच.* जास्त रंगीत टेडी घेण्यापेक्षा फिकट गुलाबी रंगाचा किंवा प्रेमाचे प्रतिक असलेल्याा लाल रंगाचा टेडी घ्या.* टेडी वॉशेबल आणि त्यावर डस्ट नसलेलाच घ्या.* टेडी बेअर हार्ट शेपमध्ये असेल तर उत्तमच.
TEDDY DAY SPECIAL : नात्यात जवळीकता आणते ‘टेडी बेअर’ !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2017 12:23 PM