अनेकजण आपलं वाढलेलं वजन लपवण्यासाठी वेगवेगळ्याप्रकारे हातपाय मारत असतात. पण त्याचा सगळ्यांनाच फायदा होतो असे नाही. अनेकांना नको नको ते उपाय करुनही त्यांचं बाहेर आलेलं पोट लपवण्यात यश येत नाही. अशावेळी ते बाहेर जाणेही टाळतात. पण आम्ही तुम्हाला कपड्यांची स्टाइल बदलून कसे स्लिम दिसता येईल याच्या काही खास टिप्स सांगणार आहोत.
शर्टिंग करु नका
शर्टिंग केल्याने तुम्ही अधिक जास्त जाड दिसता. जर शर्ट तसंच घालतं तर म्हणजे शर्ट खालपर्यंत येऊ दिलं तर फायदा होऊ शकतो. तो असा शर्ट तुमच्या पोटाला चिकटणार नाही आणि तुमचं पोटही फार जास्त दिसणार नाही. पण जर तुम्ही शर्टिंग केलं तर पोट अधिक बाहेर आलेलं दिसतं आणि त्यावरच सर्वातआधी लक्ष जातं.
डार्क कपडे टाळा
डार्क रंगाचे कपडे सर्वांचंच लक्ष वेधून घेतात, त्यामुळे फार गर्द रंगाचे कपडे टाळा. पण याचा अर्थ असा नाही की, कपडे फार लाईट रंगाचे नसावे.
जॅकेट किंवा कोट वापरा
काळा रंग परिधान केल्याने लोक सडपातळ दिसतात असे सांगितले जाते. असं होण्याचं कारण ऑप्टिकल इल्यूजन सांगितलं जातं. तसेच काळ्या रंगाचे कपडे कोणत्याही इव्हेंटला चांगले दिसतात. जर टाईट फिटिंग शर्टवर काळ्या रंगाचं जॅकेट घातलं तर तुमची समस्या दूर होऊ शकते.
टाईट कपडे असावे
अनेकांना असं वाटतं सैल कपडे परिधान केल्याने त्यांचं पोट दिसणार नाही. पण अशा कपड्यांमध्ये लोक अधिक जास्त जाड दिसतात. साइजने मोठे कपडे घातल्याने लोक अधिक जास्त भारीभक्कम दिसू शकतात. असे कपडे असे निवडा जे तुम्हाला व्यवस्थित होतील. फिट कपडे वापरल्याने तुम्ही तुलनात्मक रुपाने स्लिम दिसता.
बेल्ट लावा
बेल्ट लावण्याचा अर्थ हा नाही की, तुम्ही याने तुमचं बाहेर आलेलं पोट आतं दाबावं. याचा अर्थ हा आहे की, बेल्ट वापर केवळ अॅक्सेसरीज म्हणून करावा. जेणेकरुन पॅंट चांगल्याप्रकारे फिट राहणार. जर पॅंट चांगली फिट होईल आणि तुमची बॉडीही स्लिम दिसेल.