व्याकराणातील चुका दाखवण्यापूर्वी करा विचार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2016 9:56 PM
शब्दोच्चाराच्या चुका निदर्शनास आणूण देणारे लोक हेकेखोर, संकोचित वृत्तीचे आणि आत्मकेंद्री असतात.
‘स्वच्छ पानी प्यावे’,‘येथे मिळेल पंप्मचर काढून’,'मी आणी तू’ - वाचताना तुम्हाला व्याकराणातील चुका पाहून जर राग आला असेल तर थोडे शांत बसून स्वत:च्या व्यक्तित्त्वाबद्दल विचार करण्याची गरज आहे.कारण मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या एका नव्या रिसर्चनुसार सतत दुसऱ्यांच्या शुद्धलेखन, व्याकरण किंवा शब्दोच्चाराच्या चुका निदर्शनास आणूण देणारे लोक हेकेखोर, संकोचित वृत्तीचे आणि आत्मकेंद्री असतात.या संशोधनामध्ये 83 लोकांना व्याकरण आणि शुद्धलेखनात चुका असलेले ई-मेल वाचण्यास सांगितले. त्यानंतर ई-मेल लिहणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व आणि बुद्धीमत्तेबद्दल अंदाज व्यक्त करण्यास सांगितले. तसेच या 83 लोकांचीदेखील व्यक्तीमत्त्व चाचणी घेण्यात.यावरून असे दिसून आले की, व्याकराणाच्या चुका पाहून नाक मुरडणाऱ्या लोकांचे इतरांशी अधिक मतभेद होतात, स्वत:चेच म्हणने कसे खरे यावर त्यांची सुई अडकलेली असते. दुसऱ्या एका संशोधनानुसार, दुसऱ्यांच्या चुका काढणारे वरिष्ठ आपल्या सहकाऱ्यांना सन्मानाने वागवत नाहीत.व्याकरण जरी महत्त्वाचे असले तरी, लोकांच्या कधी आणि किती चुका काढायच्या हे समजले पाहिजे. पण, उद्या शाळेतील मराठीच्या शिक्षकाने तुमच्या चुका काढल्यावर फक्त त्यांना काही म्हणू नका म्हणजे झाले.