शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

TRICKS : वाय-फाय स्पीड वाढवा या सोप्या ट्रिक्सने !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2017 10:38 AM

बऱ्याचदा आपणास इंटरनेटचा खूपच कमी स्पीड मिळतो. तर आज आपण वाय-फाय स्पीड कसा वाढवावा हे अगदी सोप्या ट्रिक्सने जाणून घेऊया.

-Ravindra Moreइंटरनेट आज सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे आणि विशेष म्हणजे त्यात स्पीडची काय भूमिका असते हे आपण समजू शकत नाही. इंटरनेटसाठी कमाल लॅपटॉप आणि स्मार्टफोनचा वापर होतोय आणि स्पीडसाठी वाय-फाय. मात्र बऱ्याचदा आपणास इंटरनेटचा खूपच कमी स्पीड मिळतो. तर आज आपण वाय-फाय स्पीड कसा वाढवावा हे अगदी सोप्या ट्रिक्सने जाणून घेऊया. वाय-फाय राऊटरला घरात ठेवतेवेळी काही लहान गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. हे राऊटर सर्व दिशांमध्ये आपले सिग्नल पाठवितात यासाठी त्याला कोणत्याही भिंती शेजारी ठेवू नका. शक्य असेल तर वाय-फाय राऊटरला घरात अशा ठिकाणी ठेवा जेथून संपूर्ण घरात सिग्नल मिळतील. बाहेरुन येणारे काही टेलिफोनच्या तार घराच्या ज्या ठिकाणी येत असतील, त्याठिकाणी राऊटर ठेवल्यास चांगल्या प्रकारे सिग्नल मिळतात. सध्या बाजारात येणाऱ्या नवीन राऊटरमध्ये कित्येक नवीन फीचर्स समाविष्ट असतात. अशा अपडेट्सवर नक्कीच लक्ष असूद्या. कारण यामुळे आपल्या इंटरनेट ब्राऊजिंगवर चांगला परिणाम होऊ शकतो. राऊटरचे सिग्नल वेगवेगळे रेडिओ सिग्नल देतात. आपले स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि अन्य डिव्हाईस या रेडिओ सिग्नलला कनेक्ट करून इंटरनेटला कनेक्ट करतात. यासाठी कित्येकदा पासवर्डमध्येही बदल करावा लागतो. कधी-कधी हाय गेन अँटेना लावून राऊटरची क्षमता वाढवू शकता. जर असे करणे आपल्यासाठी सोपे नसेल तर आपण वाय-फाय एक्सटेंडेरदेखील खरेदी करू शकता. फक्त त्याला एका विद्युत प्लगशी कनेक्ट करा. हे आपोआपच सिग्नलसाठी आपल्या राऊटरला कनेक्ट करुन घेते. यानंतर ज्याठिकाणी आपल्याला सिग्नल मिळत नव्हते त्याठिकाणीही सिग्नल मिळतील. हे सर्व करताना आपल्या राऊटर सिक्युरिटीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. जर आपण वाय-फाय एक्सटेंडेरचा वापर करत असाल तर त्यासोबत एक पासवर्डदेखील गरजेचा आहे. असे केले नाहीतर कोणीही अनोळखी व्यक्ती कनेक्ट होऊ शकतो.