आॅफिस मीटिंगसाठी मंगळवारी दु. २.३० ही वेळ सर्वोत्तम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2016 5:48 PM
मंगळवारी दुपारी २.३० वाजताची वेळ ही आॅफिस मीटिंगसाठी सर्वात योग्य असल्याचे समोर आले.
आॅफिस मीटिंग अनेक कर्मचाऱ्यांसाठी नावडीची गोष्ट असते. एक तर आपण काय केले आणि काय करणारा याची सविस्तर माहिती वरिष्ठांना देण्याचे टेन्शन आणि दुसरे म्हणजे हाती असलेले काम सोडून जावे लागते. अशा तºहेने जर कर्मचाऱ्यांचेच मन होत नसेल तर या मीटिंग्समधून काहीच साध्य होत नाही.मग प्रोडक्टिव्ह मीटिंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती? याचे उत्तर शोधण्यासाठी इंग्लंडमधील ‘यूकॅनबुकमी’ नावाच्या कंपनीने एक सर्वेक्षण केले. त्यानुसार मंगळवारी दुपारी २.३० वाजताची वेळ ही आॅफिस मीटिंगसाठी सर्वात योग्य असल्याचे समोर आले.कंपनीने पाठवलेल्या ५.३ लाख इन्व्हिटेशन्सला आलेल्या सुमारे वीस लाख प्रतिसादांतून मंगळवारी दु. २.३० या वेळी बहुतांश कर्मचारी कामाच्या व्यापातून मोकळे असतात असे दिसून आले. आॅफिसमध्ये टीम मीटिंग शक्यतो सोमवारी सकाळी आयोजित केल्या जातात, परंतु सर्व्हेत असे आढळले की, मीटिंग आयोजित करण्याचा हा सर्वात वाईट वेळ आहे. तसेच सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवशी कर्मचारी आॅफिसच्या बाहेर असण्याची शक्यता जास्त असते.दुपारच्या वेळी मीटिंग ठेवण्यचा आणखी एक फायदा म्हणजे त्यावेळी कर्मचाऱ्यांचे बरेचसे काम झालेले असते. ते मीटिंगसाठी तयार राहू शकतात. दुसºया एका सर्व्हेतून मंगळवार हा सर्वाधिक प्रोडक्टिव्ह दिवस असतो असे आढळून आले आहे.