फ्री आणि सेफ मूव्हीज पाहण्यासाठी वापरा या सात वेबसाइट्स !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2017 10:51 AM
जर आपणास आॅनलाइन हॉलिवूड किंवा बॉलिवूड मूवीज फ्रीमध्ये पाहत असाल तर कित्येक साइट्स आहेत, मात्र याच्यातील काहीच साइट्स यूजर्ससाठी सेफ असतात
-Ravindra Moreजर आपणास आॅनलाइन हॉलिवूड किंवा बॉलिवूड मूवीज फ्रीमध्ये पाहत असाल तर कित्येक साइट्स आहेत, मात्र याच्यातील काहीच साइट्स यूजर्ससाठी सेफ असतात. मात्र आम्ही आपणास अशा काही साइट्सविषयी माहिती देत आहोत त्याद्वारे आपण आॅनलाइन मूव्हीजचा सेफ आणि फुल एन्जॉय करु शकता. * प्राइमवायर :या वेबसाइटवर पूर्ण मूवीज तर मिळू शकते मात्र नवा मूव्ही मिळणे थोडे कठीण आहे. पण काही वेळापूर्वी रिलीज झालेले मूव्हीज पाहायची असल्यास तर ही एक चांगली वेबसाइट आहे. https://www.primewire.ag/ या वेबसाइटवर कोणत्याही चित्रपटाच्या लिंकवर क्लिक केल्याने त्याचे डिस्क्रिप्शन ओपन होते.* आॅनलाइन मूव्ही गोल्ड :या वेबसाइटवर हिंदी, इंग्लिश, बंगाली, तमीळ, तेलुगु, मल्याळम आणि डब केलेले बरेच चित्रपट पाहू शकता. सोबतच नवा चित्रपटदेखील मिळतो. लेटेस्ट, मोस्ट व्यूड, ट्रेंडिंग आणि रॅँडम कॅटेगरीचे मूव्हीच पाहू शकता. जर आपणास लेटेस्ट आणि लवकर स्ट्रिम होणारा चित्रपट हवा असेल तर http://onlinemoviesgold.com/ या लिंकवर क्लिक करा.* डेलिमोशन :http://www.dailymotion.com/in या वेबसाइटवर चित्रपटांबरोबरच टीव्ही शोदेखील पाहावयास मिळू शकतात. ही फ्रेंच वेबसाइट १८ भाषांमध्ये उपलब्ध आहे. सोबतच या वेबसाइटवर आपला एखादा व्हीडिओदेखील अपलोड करु शकतो, मात्र व्हीडीओ लिमीट २ जीबी आणि ६० मिनिटाचाच असावा. * आॅनलाईन मूव्ही वॉच: हिंदी, इंग्लिश शिवाय पंजाबी, बंगाली, मराठी, गुजराती, नेपाळी अशा कित्येक प्रादेशिक भाषांमध्ये या साइटवर चित्रपट आहेत. या साइटवर चित्रपट पाहण्यासाठी यूजर्सला आपल्या सिस्टममध्ये ‘अॅडब्लॉक’ एक्सटेंशन काढावा लागेल. विशेष म्हणजे http://onlinemoviewatchs.com/ या साइटवर यूजर्ससाठी लेटेस्ट मूवीज उपलब्ध केल्या आहेत. * याहू स्क्रीन :याहू स्क्रीनमध्येही प्राइमवायरसारखे नवे चित्रपट मिळण्यासाठी थोड्या अडचणी येतात. तरीही ट्रेलर, न्यूज, टीवी शो आणि मूवीज https://in.screen.yahoo.com/ movieplex/ या साइटवर आपण सहज पाहू शकतो. कोणत्याही व्हिडिओला ही साइट लवकर स्ट्रीम करते. जर आपले इंटरनेट स्लोे आहे तरीदेखील याहू स्क्रीनद्वारे मूवीज पाहू शकता. * एरोज नाऊ :http://erosnow.com/#!/ या वेबसाइटवर एरोज एंटरटेनमेंटचे सर्व चित्रपट सहज पाहावयास मिळतात. मात्र या साइटवर लेटेस्ट मूवीज उपलब्ध नाहीत. मात्र एरोजचे सहा महिने अगोदरचे चित्रपट पाहू शकता. यावर व्हिडिओ पाहण्यासाठी अगोदर यूजर्सला आपले अकाऊंट बनवावे लागेल. * बॉक्स टीवी :cnxoldfiles/a> या साइटवर यूजर्स टीवी शोदेखील पाहू शकतात.