रुबाबदार व्यक्तिमत्त्वासाठी वापरा ‘टाय’ !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 3:51 PM
आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा चांगले दिसण्यासाठी महिला वर्गाला मेकअप, दागिने, फॅशनेबल कपडे आदी पर्याय असतात.
आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा चांगले दिसण्यासाठी महिला वर्गाला मेकअप, दागिने, फॅशनेबल कपडे आदी पर्याय असतात. पुरुषांकडे त्या तुलनेने फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. मात्र, पुरूष रुबाबदार व्यक्तिमत्त्वासाठी ‘टाय’चा वापर करु शकतात. आजच्या सदरात आपण टायचे प्रकार किती व नेमके कोणत्याप्रकारच्या टायमुळे आपले व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसेल याविषयी जाणून घेऊयात...लग्न, संमेलने, सोहळा, सभा आदी कार्यक्रमात महिला वर्ग पुरुषांना मागे टाकत आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडतात. पुरुषवर्गाने आता पुढाकार घेत आपल्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्यासाठी टाय वापरायला काहीही हरकत नाही. काही शाळांमध्ये तर गणवेशात टाय हा अनिवार्य आहे. त्यानंतर मात्र आपण रोजच्या जगण्यात टाय वापरतच नाही. बहुतेकदा फक्त एकतर लग्न सोहळ्याप्रसंगी नाहीतर नोकरीच्या मुलाखतीच्या वेळी क्वचितच टाय बांधून जातो. तसे मार्केटिंग अथवा विक्री क्षेत्रात काम करणाऱ्याना तर ड्रेस कोड म्हणून रोज टाय बांधावाच लागतो. टाय बांधल्याने आपले व्यक्तिमत्त्व रुबाबदार तर दिसतेच शिवाय टाय सभ्यतेचा संकेतदेखील मानला जातो. आपण काय काम करतो, किती पैसे कमवितो याला महत्त्व नाही, पण आपण चारचौघात कसे दिसता याला महत्त्व आहे. त्यामुळे विशेष प्रसंगी, नाईट आऊट किंवा पार्टीमध्ये एकदम रुबाबदार, क्लासी किंवा फंकी दिसण्यासाठी तुमच्या कपाटात काही चांगल्या टाय नक्कीच असायला पाहिजेत. शर्टवर कोणत्या प्रकारची टाय चांगली दिसेल हे आपण आपल्या शरीरयष्टीवरून ठरवू शकतो. जसे स्थूल शरीरयष्टी आणि जास्त वजन असणाऱ्या माणसांना ब्रॉड टाय आणि वजनाने कमी असलेल्या व्यक्तींना थीन टाय शोभून दिसते. प्रसंगानुरूप टायची लांबी बदलत राहते. कार्यालयात परिधान केल्या जाणाऱ्या टाय या कॉलरपासून बेल्टपर्यंत लांब असतात, तर पार्टीमध्ये परिधान केल्या जाणाऱ्या टाय या कॉलरपासून बेली बटन लांबीच्या असतात. स्किनीकॉटन, चामडे किंवा लोकरापासून बनविल्या जाणारा हा स्किनी टाय विदेशात आताही तेवढाच प्रसिद्ध आहे. फोर इन हॅन्ड नेक टायमध्ये काही बदल करुन तयार करण्यात आलेला हा टाय १९५० च्या दशकापासून बेटलिससारख्या पॉप आयकॉन्समुळे लोकप्रिय आहे. चेक्स, स्ट्रिप्स, प्लेन, लाइन्स अशा अनेक डिझाइन्समध्येही टाय उपलब्ध असते. फॉर्मल पँट्सपेक्षा जिन्सवर स्किनी टाय फार उठून दिसतात. फोर इन हॅन्ड नेकतरुणाई व नोकरदारांमध्ये सर्वात लोकप्रिय असणारा टाय म्हणजे फोर इन हॅन्ड नेक होय. हा टाय विविध रंग, डिझाईन्स, रुंदी आणि कापडाच्या विविध प्रकारात उपलब्ध आहे. कार्यालयात वावरताना आणि पारंपरिक प्रसंगांसाठी टाय आपणास एक चांगला लूक प्रदान करते.सेव्हन फोल्ड (सातकप्पी)या प्रकारचा टाय सिल्क कापडापासून बनविण्यात येत असून स्ट्रिप्स, डॉट्स, चेक्स आदी विविध प्रकारच्या डिझाइन्समध्ये उपलब्ध आहेत. तसेच यात वापरण्यात येणाऱ्या मटेरियल्समुळे याची किंमतदेखील जास्त असते. हा टाय दिसायला खूप आकर्षक असल्याने कार्यालयात किंवा विशेष प्रसंगी वापरल्यास आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा हटके दिसते. अॅक्रॅलिकया प्रकारचा टाय सध्या बॉलिवूडमधील अभिनेते आवर्जून वापरत असल्याने खूप लोकप्रिय ठरत आहे. यास क्लिप आॅन टाय असेही म्हटले जाते. या अॅक्रॅलिक टायमुळे काचेचा टाय लावल्यासारखेच आपल्याला वाटते. औपचारिक प्रसंगांमध्ये आणि पार्टीमध्ये हा टाय उठून दिसतो.बोव्हसेलिब्रेटींच्या अथवा विविध प्रकारच्या पार्ट्यांमुळे बोव्ह टाय खूपच प्रसिद्ध आहे. दक्षिणी देशात प्रचलित सूटवर तर हा टाय अधिकच शोभून दिसतो. प्लेन किंवा चेक्स डिझाइनमध्ये उपलब्ध असणाºया या टाय औपचारिक किंवा विशेष प्रसंगांबरोबर नाईट किंवा कॉकटेल पार्टीमध्येही आपल्याला एक वेगळा लूक प्रदान करतात. क्लासिक बोव्ह टायच्या बदलाचा एक प्रकार असलेल्या या वेस्टर्न बोव्ह टायला साऊथवेस्ट किंवा वेस्ट बोव्ह टाय असेही म्हणतात. सिल्क, पॉलिस्टर, कॉटन, लोकर अशा मटेरिअल्सपासून बनविल्या जाणाऱ्या या टायचा एक मजेशीर भाग म्हणजे या टायकडे बघून कर्नल सँडर्सची आठवण येते. साऊथवेस्ट बोव्ह टाय ही नैऋत्येकडील देशांमध्ये औपचारिक प्रसंगांसाठी अजूनही प्रचलित आहे.नेकरचीफनेकरचीफ म्हणजे फॉर्मल टाय. हा तरुणाई तसेच किशोरवयीन मुलांमध्ये खूपच प्रचलित आहे. सर्वसाधारणपणे हा टाय गणवेशावर परिधान केली जात असल्याने कार्यालय अथवा औपचारिक प्रसंगांमध्ये उठून दिसत नाही. मात्र प्लेन, चेक्स किंवा डिजिटल प्रिंट अशा वैशिष्टयपूर्ण डिझाइन्समध्ये उपलब्ध असणारा नेकरचीफ दररोजच्या जीवनात एक वेगळा लूक देते.बोलोसत्तरच्या दशकात उदयास आलेला बोलो टाय कॉईन्स, पिन्स आणि क्रिसमस ट्रीमधील अलंकार, चुंबक अशा निरनिराळ्या वस्तूंपासून बनविला जातो. पुरुषांच्या गळ्यातील दागिन्यांसारख्याच दिसणारा हा टाय परदेशात अजूनही खूप लोकप्रिय आहे.ravindra.more@lokmat.com