इव्हाची ड्रेस डिझायनर बनणार व्हिक्टोरिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:07 AM
गायिका व्हिक्टोरिया बेकहॅम आता तिची फ्रेंड आणि अभिनेत्री इव्हा लाँगोरिया हिच्या लग्नासाठी कपड्यांचे डिझाईन करणार असल्याचे समजते.
गायिका व्हिक्टोरिया बेकहॅम आता तिची फ्रेंड आणि अभिनेत्री इव्हा लाँगोरिया हिच्या लग्नासाठी कपड्यांचे डिझाईन करणार असल्याचे समजते. फॅशन डिझायनर असलेली व्हिक्टोरियाला याबाबत विचारण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देऊन तिनेही लग्नासाठी डिझाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. जोस अँन्टोनिओसोबत तिचा विवाह होणार येत्या उन्हाळ्य़ात होणार आहे. यानिमित्ताने तिला फॅशन डिझायनर असल्याचा उपयोग करून चांगली कलाकृती सादर कण्याची संधी मिळणार आहे. जोस यानेही यासाठी तिला विनंती केल्याचे म्हटले आहे. लाँगोरियाचे याआधी टायलर ख्रिस्तोफरसोबत विवाह झाला होता. त्यानंतर टोनी पारकर सोबत तिचे लग्न झाले. इव्हाच्या विवाहाचे फोटोग्राफ्स जगभरात पाहिले जाणार असल्याने त्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.