शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

विवेकानंद रॉक मेमोरियलला एकदा अवश्य भेट द्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 5:16 PM

महान ज्ञानीपुरुष स्वामी विवेकानंदांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा म्हणजे कन्याकुमारी. हे दक्षिणेतील मुख्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असून, याठिकाणी विवेकानंद रॉक मेमोरियलची स्थापना झालेली आहे.

महान ज्ञानीपुरुष स्वामी विवेकानंदांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा म्हणजे कन्याकुमारी. हे दक्षिणेतील मुख्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असून, याठिकाणी विवेकानंद रॉक मेमोरियलची स्थापना झालेली आहे. विशेष म्हणजे याठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होत असते. कन्याकुमारीला भेट देण्याऱ्यामध्ये हे मेमोरियल खूपच लोकप्रिय आहे. ज्याठिकाणी स्वामी विवेकानंदांनी आत्मज्ञान प्राप्त केले त्या वनथिराई समुद्रकिनाऱ्यापासून ५०० मीटर लांब अंतरावरील भव्य खडकावर हे स्मारक बांधले आहे. विशेष म्हणजे या खडकावरून अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर, या भारतीय उपखंडातील तीन समुद्राचे विलीन बिंदू पाहू शकतो. स्मारकाच्या आत, चिंतन सभागृह किंवा ध्यानचंद मंडपम आहे, जिथे अभ्यागत एकत्र ध्यान लावू शकतात. या स्थानात शांततेची भिन्न आभा पसरलेली आहे आणि येथे एक वेगळीच मनाची स्थिरता अनुभवायला मिळते असा दावा येथे जाणारे पर्यटक करतात. ध्यानचंद मंडपममध्ये तास दोन तास ध्यान लावल्याने एकांतवासची अनुभुती प्राप्त होते. संरचनात्मकदृष्ट्या, विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये देशभरातील मंदिरांच्या स्थापत्यकलेच्या विविध शैली बघायला मिळतात. तथापि, येथील लक्षवेधक स्वागतकक्ष बेलूरच्या श्री रामकृष्ण आश्रमाची आठवण करून देतो. शिवाय, प्रवेशद्वार महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ लेणी समान आहे. मुख्य सभागृहात, विवेकानंदांचा ब्रांझचा पुतळा आहे जो त्यांच्या लोकप्रिय परिव्राजक पवित्रामध्ये बघायला मिळतो.