- पवित्रा कस्तुरेपाऊस आला की आपण रोमॅण्टिक होतोच. त्यात हिंदी सिनेमाचा प्रभाव. सिनेमातली नायिका पावसात भिजत, मोकळ्या केसांनी नाचते. गाते. वाऱ्यावर केस उडतात. भिजतात. त्या ओल्या केसांतलं पाणी ओघळतांना सुंदर दिसतं म्हणे. हे सारं पाहून ऐन पावसात केस मोकळे सोडून अनेकजणी लोकलचाही प्रवास करतात. टू व्हीलर चालवतात. पावसात केस भिजतात. तशाच ओल्या केसांनी आॅफिसच्या एसीत बसून काम करावं लागतं. आणि मग कामाच्या घाईत पावसाचा रोमॅण्टिसिझम बाजूला ठेवून केसांकडे दुर्लक्ष होतंच. तुमचंही असंच होतं का? दरवर्षी पावसाळ्यात केसांच्या तक्रारी वाढतात का? तसं असेल तर यंदाच्या पावसात काही गोष्टी नक्की करा. त्या केल्या तर कधीतरी एखाद्या सुटीच्या दिवशी केस मस्त मोकळे सोडून पावसात भिजायलाही हरकत नाही.१) आॅफिसला जाताना शक्यतो केसांची पोनीटेल, आंबाडा घालून, केस बांधून जा. म्हणजे केस पावसात भिजणार नाहीत. मोकळेच केस आवडत असतील तर आॅफिसला गेल्यावर केस मोकळे सोडा. पण छत्री सांभाळताना,ट्रेनमध्ये उडणारे केस, भिजणारे केस. आणि त्यातून न वाळणारेही केस. शेवटी केसांचा पोत बिघडतोच.२) केस ओले असले, आपण पावसात भिजलो तर केस कोरडे करा. पुसा. त्यासाठी सोबत एखादा पंचा, टॉवेल ठेवा. ओल्या केसांत कोंडा होणं, खाज येणं, केस तुटणं या तक्रारी वाढतात.३) केसांना रोज तेल लावायलाच हवं. पण पावसाळ्या नको. कारण केस जास्त आॅयली होतात. चिकचिकाट वाढतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच तेल लावा.४) केसात कोंडा वाढतो या दिवसात त्यामुळे केसांना चांगला शॅम्पू लावा. कोंडा कमी करण्यासाठी उपचार करा.५) पावसात भिजल्या केसांना एखादा चांगला सिरम लावून त्यांचा पोत बिघडणार नाही याची काळजी घ्या.
पावसात केस मोकळे सोडून फिरताय? -सांभाळा..
By admin | Published: June 16, 2017 1:51 PM