शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

​काय आहे 4जी टेक्नॉलॉजी..?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2016 6:29 PM

सध्या तंत्रज्ञानाचे युग असून 1 जी पासूनची भरारी 4 जी पर्यंत घेतली आहे. आज सर्वत्र 4 जीची चर्चा सुरु आहे. मग नेमकं काय आहे 4 जी टेक्नॉलॉजी याबाबत आजच्या सदरात जाणून घेऊया...

सध्या तंत्रज्ञानाचे युग असून 1 जी पासूनची भरारी 4 जी पर्यंत घेतली आहे. आज सर्वत्र 4 जीची चर्चा सुरु आहे. मग नेमकं  काय आहे 4 जी टेक्नॉलॉजी याबाबत आजच्या सदरात जाणून घेऊया...1 जी4 जी टेक्नॉलॉजी ही मोबाइल टेक्नोलॉजीची चौथी पीढी म्हणजे जनरेशन होय. चौथी जनरेशन यासाठी की, याअगोदर एका पाठोपाठ असे तीन जनरेशन येऊन गेले आहेत. मग 1 जी अगोदर काय होते असा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर या अगोदर होता लॅँडलाईन. 1 जी टेक्नॉलॉजी पासूनच वायरलेस टेलिफोन म्हणजेच मोबाइलचा (भ्रमणध्वनी) परिचय जगाशी झाला. मात्र अनालॉग सिग्नलवर आधारित 1 जी टेक्नॉलॉजीमध्ये खराब आवाज येणे, मोबाइल हॅण्डसेटचा मोठा आकार आणि वजन तसेच डाटा स्पीड अतीमंद अशा समस्या होत्या. 2 जी1 जी टेक्नॉलॉजीमध्ये येणाऱ्या समस्यांचे निराकरण 2 जी टेक्नॉलॉजीमध्ये करण्यात आले. ही टेक्नॉलॉजी डिजीटल सिग्नलवर आधारित असून याद्वारे आपण फोनकॉल सोबतच इंटरनेटचाही आनंद आरामात घेऊ शकतात. ही टेक्नॉलॉजी आल्यानंतर मोबाइल युगात जणू क्रांतीच झाली. आता सुद्धा भारतात बहुतांश लोक 2 जीचाच वापर करीत आहेत. मात्र 2 जीचा डाटा ट्रान्सफर स्पीड 236 kbps आहे,  ज्यात पिक्चर मॅसेज, टेक्स मॅसेज आणि मल्टीमीडिया मॅसेज आरामाने पाठविता येतात. मात्र व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉन्फ्रे सिंग आणि मोबाइल टीव्ही यात 2 जी अयशस्वी ठरली.    3 जी2 जी नंतर थर्ड जनरेशन म्हणजेच 3 जी आले.  यात डाटा ट्रान्सफर स्पीड 21 mbps आहे, जी 2 जीच्या तुलनेने खूप चांगली आहे. याने मोबाइल यूजर्ससाठी व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग आणि मोबाइल टीव्ही या सुविधा सहज उपलब्ध मिळू लागल्या. 3 जी आल्यानंतर मोबाइल आणि लॅपटॉपसाठी स्पेशल आॅनलाइन टीव्ही अ‍ॅप्लिकेशन आले, सोबतच व्हिडिओ कॉल करण्यासाठी फोनमध्ये फ्रं ट फेसिंग कॅमेरादेखील आला. आणि या कॅमेराचा उपयोग सर्वचजण सेल्फीसाठीदेखील करु  लागले. 4 जीभारतीय नागरीक 3 जीचा आनंद घेत असतानाच 4 जीचा धमाका सुरू झाला. ही टेक्नॉलॉजी 3 जीच्या तुलनेने 5-10 पटीने जलद आहे. कारण याच्यात इंटरनेटचा स्पीड 100 mbps ते 1 gbps पर्यंत आहे. यामुळे स्मार्टफोनवर विना बफरिंग टीव्ही पाहणे, व्हिडिओ कॉल करणे, चित्रपट, सॉफ्टवेअर, गेम्स डाउनलोड करणे आदी सुविधा अत्यंत जलद गतीने मिळू लागल्या. आपण जसे कंप्युटरमधून एखादी फाईल कॉपी करतो अगदी त्याच पद्धतीने. तर मग 4 जी टेक्नॉलॉजीचे स्वागत करुया आणि मनमुराद आनंंद लुटूया...