शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

मुलांना काटकसर शिकवायची तर काय कराल?

By admin | Published: July 01, 2017 4:57 PM

मुलांना पैशाची किंमत नाही म्हणून पालक कटकट करतात, पण पैशाचं मोल त्यांना तुम्ही शिकवता का?

-नितांत महाजनघरोघरची एकच रड, आजकालच्या मुलांना पैशांची काही किंमत नाही. त्यांना पैशाचं मोल कळत नाही. सतत हट्ट करतात. हजार-दोन हजार रुपयांची वस्तू सहज मागतात. ती मोडतात. फेकतात. या कार्ट्यांना कसं शिकवणार पैशाचं महत्व? स्वत: कमवायला लागल्यावरच येईल अक्कल. असा घरोघरचा त्रागा तसा काही नवीन नाही. पण आपल्या मुलांना पैशाचं मोल समजावं, निदान त्यांच्या हाताला बचतीची सवय लागावी, त्यांना हिशेब यावा, व्यवहार कळावा म्हणून आपण काय करतो? काही नाही. म्हणूनच काही गोष्टी घरच्याघरी करा. मुलं हिशेब शिकतील आणि पैशाचं मोलही त्यांना समजेल.१) पैसे वाचव, असं मुलांना सांगितलं तर ते का ऐकतील. नुस्ते पिगी बॅँकेत पैसे भरुन ठेवण्यात त्यांना काहीही मजा वाटत नाही. त्यामुळे मुलांना काहीतरी लक्ष्य ठरवू द्या. म्हणजे सेव्हिंग गोल. कशासाठी पैसे वाचवायचे हे ते ठरवतील. ते पालकांनी ठरवू नये. म्हणजेच कुठं पिकनिकला जायचं, सायकल घ्यायची, नवीन गेम, नवीन पुस्तकं काहीही. मुलं म्हणतील ते, त्यासाठी त्यांनी अमूक इतके पैसे साठवले तर उरलेले पैसे आपण घालू असं प्रॉमिस पालकांनी द्यावं. त्यासाठी मुलं हळूहळू बचत करायला, तात्कालीक मोह बाजूला ठेवायला शिकतील.

२) बजेट काय?म्हणजे जी गोष्ट त्यांना हवी आहे, त्यासाठी बजेट काय? त्याची माहिती मुलांनाच काढू द्या. त्यांना बजेट समजून घेवू द्या. त्यासाठी बचत कशी करणार, याचा प्लॅन त्यांनाच करू द्या. मागितली तर मदत करा.३) बचतच नाही तर इन्व्हेस्ट कसं करतात हे सांगा. घरातल्या घरात त्यांना तुमच्याकडे पैसे इन्व्हेस्ट करु द्या.४) बँकेत अकाऊण्ट उघडू द्या. त्यात त्यांना पैसे टाकू द्या.५) बाजारात जाऊ द्या. थोडं वाणसामान, भाजी आणू द्या. हिशेब विचारू नका. ते देतील हिशेब. तो समजून घ्या. चुकलं तर रागावू नका. चूक सांगा फक्त.६)द्यायला शिकवा. म्हणजे त्यांच्या पैशातून त्यांना कुणाला काही गिफ्ट घेवू द्या. किंवा मदत करू द्या.