2010 साली जेटब्लू विमानतील कर्मचारी स्टिव्हन स्लेटरनेदेखील अशाच प्रकारे विमानातून बाहेर पडला होता. विमान अजून थांबलेदेखील नव्हते की एक प्रवासी सामान घेण्यासाठी घाई करू लागल्याने स्टिव्हनचे त्याच्याशी भांडण झाले आणि रागाच्या भरात शिव्या देत तो बियरची बॉटल घेऊन विमानाच्या बाहेर पडला होता.Viewer photo of #united plane w/emergency slide deployed @ #iah. @jacelarson live #KPRC2 @ 4 https://t.co/cZxZe4Tu5tpic.twitter.com/6FGTDWh3FG— KPRC 2 Houston (@KPRC2) 4 April 2016
‘त्या’ फ्लाईट अटेंडंडला झाले तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2016 2:19 AM
विमान उतरताच एक फ्लाईट अटेंडंड प्रवाशी उतरण्या आधीच अतिशय घाईने एमर्जन्सी दरवाजा डघडून बाहेर पडली.
विमान प्रवास सर्वात जलद आणि सुरक्षित असतो. प्रवाशांच्या सुखमय प्रवासासाठी विमान कर्मचारी सदैव तत्पर असतात. हवाईसुंदरींचे आदारतिथ्य तर विमान प्रवासाचे प्रमुख आकर्षण असते. हसतमुख आणि अत्यंत विनम्र वागणूक ही त्यांची वैशिष्टये. मात्र ‘युनायटेड एअरलाईन्स’मधील एका महिला कर्मचाऱ्याचे वर्तन सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे होते.सोमवारी ह्युस्टन शहराच्या बुश इंटरकॉन्टिनेंटल एअरपोर्टवर फ्लाईट क्र. 1246 हे विमान उतरताच एक फ्लाईट अटेंडंड प्रवाशी उतरण्या आधीच अतिशय घाईने एमर्जन्सी दरवाजा डघडून बाहेर पडली. तिने असे का केले यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही. कंपनीतर्फे सांगण्यात आले की, त्या महिला कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांकडून आम्ही सदैव चांगल्या वर्तनाची अपेक्षा ठेवतो. अशा प्रकारच्या बेजबाबदार वागण्यामुळे प्रवाशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या सर्व वीस हजार कर्मचाऱ्यांची इभ्रत पणाला लावली नाही जाऊ शकत. ही घटना घडली तेव्हा विमानात 159 प्रवासी होते. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या मागील बाजूस असलेल्या एका पॅसेंजरला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे या फ्लाईट अटेंडंडचे ‘तसे’ वागणे कोणाच्या लक्षात आले आहे. परंतु नंतर विमान अधिकाºयांनी आम्हाला बराच वेळ विमानातून खाली उतरू दिले नाही.