व्हॉट्सअॅप बदललं... तुम्हाला समजलं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2017 7:06 AM
व्हॉट्सअॅप वापरत असाल तर लवकरात लवकर अपडेट करून घ्या. कारण, आजपासून व्हॉट्सअॅपमध्ये बदल झाले असून स्टेटस अपडेट करण्याचे एक खास फिचर त्यात समाविष्ट झालं आहे.
आतापर्यंत व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये आपली भावना शब्दांद्वारे व्यक्त करता येत होती. फार तर त्यात इमोजी अॅड करता येत होते. अन्यथा, 'Hey there, I'm using WhatsApp' असं स्टेटस डिफॉल्ट पद्धतीनं आपल्या अकाउंटवर दिसायचं. नव्या 'स्टेटस फिचर'मुळे टेक्स्टच्या जागी तुमचा छोटासा व्हिडिओही पोस्ट करू शकता.व्हॉट्सअॅप वापरत असाल तर लवकरात लवकर अपडेट करून घ्या. कारण, आता व्हॉट्सअॅपमध्ये बदल झाले असून स्टेटस अपडेट करण्याचे एक खास फिचर त्यात समाविष्ट झालं आहे. या फिचरमुळं तुमचं स्टेटस आणखी आकर्षक होणार असून त्याद्वारे फोटो, व्हिडिओ आणि GIFच्या माध्यमातून प्रत्येक क्षण मित्रांसोबत शेअर करता येणार आहेत.व्हॉट्सअॅपमध्ये नवीन काय?एखादा फोटो खास मेसेजसह शेअर करू शकता किंवा GIF ही शेअर करू शकता. त्यामुळे आता तुमचे स्टेटस जास्त गमतीशीर आणि आकर्षक दिसणार आहे. विशेष म्हणजे तुमच्या स्टेटसवर तुमची मित्रमंडळी कमेंटही करू शकतील. चॅटमधून तुम्हाला त्या कमेण्ट्स मिळतील. तुमचा मित्र कोणत्या अपडेटवर रिप्लाय देतोय, हे देखील तुम्ही आता पाहू शकता.स्टेटस अपडेट करण्यासाठी आत खास मेन्यूमध्ये आतही जावं लागणार नाही. चॅट आणि कॉल्स ऑप्शनच्यामध्येच त्यासाठी स्पेशल टॅब मिळेल. डिफॉल्ट सेटिंग्सच्या माध्यमातून तुमचे सर्व कॉन्टॅक्ट्स स्टेटस अपडेट पाहू शकतील. हवे असल्यास सेंटिग बदलता येऊ शकेल. तुमचे स्टेटस कोणी पाहावे आणि कोणी नाही, हेही तुम्हाला ठरवता येईल.स्टेटस टॅबमध्ये अनेक ग्रुप तुम्हाला दिसतील. इथे 'माय स्टेटस' मध्ये जाऊन तुम्ही तुमचे ताजे व्हॉट्सअॅप स्टेटस पाहू शकता. इथे स्वाइप केल्यानंतर तुमचे हे स्टेटस कोणी-कोणी पाहिले आहे, हेही तुम्हाला सहज कळू शकेल. इथेच दुसरा पर्याय आहे, 'रिसेंट अपडेट्स'चा. यात तुम्ही तुमच्या मित्रांचे मागील २४ तासांतील स्टेटस पाहू शकता. याव्यतिरिक्त 'व्हूव्ड अपडेट्स', 'म्युटेड अपडेट्स' देखील पाहू शकता. तुम्ही तुमचे स्टेटस डिलिट केले की, ते तुमच्या मित्रांच्या 'रिसेंट अपडेट्स'मधूनही निघून जाईल.