जेव्हा ओबामा ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’चा आनंद घेतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2016 2:17 PM
व्हर्च्युअल रिअॅलिटी व्हिडियोमध्ये काम करणारे ते पहिले राष्ट्रध्यक्षदेखील ठरले.
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांच्या ‘कूल पर्ससर्नालिटी’साठी ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा आणखी एक पैलू समोर आला जेव्हा त्यांनी आपल्या आॅफिसमध्ये लेटेस्ट ट्रेंड ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’चा आनंद घेतला. विशेष म्हणजे त्यांनी कुटुंबासोबत केलेल्या ट्रीपचाच व्हीआर व्हिडिओ पाहिला. व्हर्च्युअल रिअॅलिटी व्हिडियोमध्ये काम करणारे ते पहिले राष्ट्रध्यक्षदेखील ठरले.कॅलिफोर्नियातील सिएरा नेव्हाडा पर्वरांगामध्ये स्थित ‘योसेमिट नॅशनल पार्क’मध्ये ते आपल्या परिवारासोबत निसर्गरम्य व प्रेक्षणीयस्थळांची सफर करताना दिसतात. ‘नॅशनल जिओग्राफिक’, ‘फेलिक्स अँड पॉल स्टुडिओज्’ आणि फेसबुकच्या मालकीच्या ‘ओक्युलस’ कंपनी यांच्या संयुक्त विद्यामाने ही ११ मिनिटांची छोटेखानी फिल्म बनवण्यात आली आहे.ओक्युलसने ब्लॉगवर माहिती दिली की, ‘व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर करून प्रेक्षकांना राष्ट्रध्यक्षांचे जीवन अधिक जवळून पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश होता. ओबामा कुटुंब या व्हिडियोमध्ये योसेमिटा राष्ट्रीय उद्यानात व्हनर्ल धबधबा, फुटब्रिज आणि इतर अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेट देताना दिसतील. त्याबरोबरच हवामान बदलांच्या दुष्परिणामांबद्दल बोलताना त्यांना पाहता येईल. ओमाबा हा व्हिडियो पाहतानाचा फोटो फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने आपल्या पेजवर शेअर केला आहे. फोटोत ओबामांची उत्सुकता आणि आश्चर्य स्पष्ट दिसते.