शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

भिंग स्वत:वर कधी रोखणार?

By admin | Published: April 03, 2017 5:08 PM

मी दिसायला चांगला नाही.मी बुटकी आहे. तो गोरा आहे. ही कसली मस्त सावळी आहे. नाहीतर मी पांढरीफटक.तिच्याकडे फॅशन करायला पैसे आहेत.

इतर लोक, मित्र-मैत्रिणी आपल्या लूक्सबद्दल काय म्हणतात याचं किती बर्डन घेऊन आपण फिरत असतो. मालवाहक गाडी होऊन जाते आपली. इतरांची आपल्याविषयीची मतं वाहणारी! आपलं आपल्याविषयी काही मत असतं की नाही? 

 

मी दिसायला चांगला नाही.मी बुटकी आहे. तो गोरा आहे. ही कसली मस्त सावळी आहे. नाहीतर मी पांढरीफटक.तिच्याकडे फॅशन करायला पैसे आहेत. माझ्याकडे नाहीत. मी पण पार्लरला गेलंच पाहिजे. मित्राने हेअर स्टाइलवर किती पैसे खर्च केले. मला पण अशीच हेअर स्टाइल पाहिजे. माझं वजन खूपच कमी आहे. तो किती लठ्ठ आहे. मला हे कपडे सूट होतात का? माझ्याच चेहऱ्यावर पिंपल्स आहेत. रंग, उंची, वजन, पैसे, कपडेलत्ते.... आपलं भिंग कायम दुसऱ्याकडे काय बरं आहे आणि त्यात काय खोट काढता येते, यावरच रोखून धरलेलं असतं. त्यामुळे, दुसऱ्याचं सुख आहे त्यापेक्षा मोठं होऊन आपल्यावर आदळतं. त्यात आपण दुरून ते बघत असतो. ज्याला आपण दुसरा सुखात आहे असं म्हणतोय ते खरंच तसं नसूही शकतं. आपल्याला त्याच्यावर संशोधन करायचं आहे की काय? समजा केलं, तर उपयोग काय? याच्या त्याच्यात खोट काढायचा चाळाच लागतो आपल्याला. म्हणजे फोकस सगळा दुसऱ्यावरच! 

 

असं का होतं? 

कारण आपल्यातली कमतरता आपण जाणून घेत नाही. तिच्यावर काम करत बसण्यापेक्षा दुसऱ्याच्या यशावर, सुखावर ताशेरे ओढणे सोपे असते. मला एखादा विषय नीट कळत नाही, मी त्यावर हवी तितकी मेहनत घेत नाही म्हणून मार्क्स कमी मिळतात, हे सत्य असतं. पण दुसरा कसा वशिल्याने पुढे गेलाय, याचं गॉसिप केलं की त्याला आपल्या रांगेत आणून बसवता येतं. तुम्ही गुप्तहेर आहात का? कसा शोधला त्याचा वशिला? की मनाचा खेळ आहे हा आपल्याच? मान्य आहे, असं होतंही कधी. पण आपण आपली रेषा मोठी करण्यात वेळ घालवावा. दुसऱ्याच्या बऱ्या- वाईटावर भिंग लावून बसून आपले प्रश्न सुटणार नसतात. 

तुलना कुणाशी नक्की?

आपल्या दिसण्याबाबत आत्मविश्वास न येण्याचं, छान न वाटण्याचं मूळ कारण आपण आपल्याला नीट समजून घेत नाही, हेच असतं. सततची तुलना सुरू असते. मनापासून आनंदी राहणं, स्वच्छतेचे बेसिक भान असणं, आरोग्य जपणं इतकंसुद्धा आपला लूक मस्त एनहान्स करू शकते. त्यासाठी डिझाइनर कपड्यांची गरज नाही की येता-जाता पार्लरवारीची आवश्यकता नाही. आपलं आयुष्य आपल्या हिमतीवर मार्गी लावलं की करू की ही पण मजा. पण आता मी अमक्याच घरात जन्माला आलो आणि माझी परिस्थितीच अशी आहे इथपासून कशाला सुरू करायचं रडगाणं? त्यात एकही गोष्ट चांगली सापडत नाहीये का? आपल्यावर स्वत:वर हे भिंग कधी रोखणार? तुम्ही जे काही आहात, त्याहीबद्दल जेलस वाटणारं कोणी ना कोणी असणार. या भिंग प्रकारात एक त्रुटीपण असते. दुसऱ्याचे केवळ एकाच गोष्टीतले चांगले अथवा वाईट खूप मोठे होऊन दिसते. ती एकच गोष्ट म्हणजे सगळं आयुष्य नसतं. त्या एका गोष्टीसाठी त्याने बरेच काही गमावलेले देखील असू शकते. खूप कष्ट घेतलेले असतात. आपण फक्त एण्ड प्रॉडक्ट बघत बसतो. तुलनेनेच बेजार होतो. 

 

दिसण्याचं काय?

खरे तर, दिसण्याविषयीचा किंवा एकूणच न्यूनगंड आपल्यात सुधारणा करायला कामी लावता आला पाहिजे. न्यूनगंडातून प्रेरणा घेता अली पाहिजे. ते बाजूलाच राहतं आणि आपलं भिंग दुसऱ्याचंच आयुष्य सतत तपासत बसतं! लोक एकीकडे म्हणतात, ‘फर्स्ट इम्प्रेशन, बेस्ट इम्प्रेशन’. दुसरीकडे तेच लोक म्हणतात, ‘का रे भूललिया वरलिया रंगा..’. 

मग आपण आपल्या सोयीने ‘का रे भूललिया’मध्ये तरी जातो किंवा महागडे कपडे, पार्लरवाऱ्या आणि इतरांचं अंधानुकरण सुरू करतो.

‘का रे भूललिया’मध्ये अजून एक लोचा असतो. आपण खरंच जर आहेत त्यात पण बरे राहत नसू, तर आळशीपणाच सोकावतो. आहे ते छान आहे म्हटलं, की सुधारणेला काही वावच राहत नाही. दुसरीकडे, अंधानुकरण केलं तर ते आपल्याला सूट होईलच असंही नसतं आणि पैसे जातात ते वेगळेच. दुसरे लोक, मित्र-मैत्रिणी आपल्या लूक्सबद्दल काय म्हणतात याचंही किती बर्डन आपण घेऊन फिरत असतो. मालवाहक गाडी होऊन जाते आपली. इतरांची आपल्याविषयीची मतं वाहणारी! आपले आपल्याविषयी काही मत असतं की नाही? 

आपण कमी आहोत हे ‘जाणणं’ आणि आपण कमी आहोत असं वाटणं यात खूप फरक आहे. आपण कमी आहोत, हे जाणलं तर कमी भरून काढता येते. आपण कमी आहोत, असं बसल्या-बसल्या नुसतं वाटतच राहिलं तर त्यानं कमतरता अजून वाढतच राहील.

ताठ मानेनं चालणं, प्रसन्न राहणं आणि समोरच्याला नीट ऐकू येईल इतपत आत्मविश्वासाने बोलणं असा प्रयोग करून बघा आठ दिवस. तुमच्या अंगावर कोणते कपडे आहेत, ते किती भारी अथवा बोगस आहेत, तुम्ही केसांची कोणती स्टाइल केलीये, तुम्ही उंच आहात की बुटके आणि गोरे आहात की काळे, सावळे काहीही फरक पडत नाही. लोक तुमचे मुद्दे ऐकू लागतील. तुम्ही तुम्ही म्हणून कसे आहात, ते समजू लागतील. 

ट्राय तर करा!

 

 

मनात टांगलेला फोटो

 

सेल्फी प्रकारामुळे आपण अमुकच अँगलने छान दिसतो, असेही लोक डोक्यात पक्के करून टाकतात. छान हसायची संधी असते. पण फोटोसमोर उभं राहिलं की आपण दात न दिसू द्यायची काळजी घ्यायला लागतो. नाहीतर, खोटंखोटं हसायला तरी लागतो. अमुकच तिरप्या अँगलने उभं राहिलं की आपण बरे दिसतो, असं काहीतरी डोक्यात फिक्स करून टाकतो. मग सगळे फोटो तिरपे तिरपे! प्रत्येकाची एक थिअरी होऊन जाते, आपण कोणत्या अँगलने बरे दिसतो ही. मग ते तसेच उभे राहतात फोटोला. आपल्यापेक्षा अमक्याचे फोटो किती भारी येतात नाही, असंही सुरू होतं मग. आपल्या मनात आपला एक फोटो असतो. तो अभावांनीच नटलेला असतो अनेकदा. 

 

 

- प्राची पाठक prachi333@hotmail.com

( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)