महिला करतात जास्त खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:08 AM
एकाच प्रोडक्टसाठी महिलांना पुरुषांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात.
नवरा-बायकोचे जोक्स बहुतांश वेळा बायकोच्या खर्चाविषयी असतात. सण असू दे की अँनिव्हर्सरी महिलांची शॉपिंग ठरलेलीच. मुळात शॉपिंग हा महिलांचा सर्वात आवडीचा छंद आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.त्यामुळे महिला पुरुषांपेक्षा जास्त खर्च करतात, हे स्पष्ट आहे. आता एका अध्ययानतून यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.न्यूयॉर्क येथील डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेयर्सने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, एकाच प्रोडक्टसाठी महिलांना पुरुषांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. यावेळी स्त्री आणि पुरुषांसाठी असलेल्या ८00 प्रोडक्टस्चा अभ्यास करण्यात आला.ब्युटी प्रोडक्ट, कपड्यांपासून खेळण्यांपर्यंत सर्वच गोष्टींत महिलांना पुरुषांपेक्षा जास्त खर्च करावा लागला. याचे कारण, महिलांचे ब्युटी प्रोडक्ट्स हे पुरुषांच्या ब्युटी प्रोडक्टसपेक्षा १३ टक्के अधिक महाग होते.