शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

सोशल मीडियात सुसाईड नोट का लिहिली जातेय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 5:15 PM

सोशल मिडियाचाच वापर करून आत्महत्या करू इच्छिणाऱ्या लोकांना त्या भावनेपासून आपण परावृत्त करू शकतो का?

-मुक्ता चैतन्य 

 चित्रपट निर्माते अतुल तपकीर यांनी काही महिन्यापूर्वी आत्महत्या केली, आत्महत्या करताना सुसाईड नोट फेसबुकवर पोस्ट केली. आयबीएन लोकमतमध्ये काम करणाऱ्या नितीन शिर्के यांनी आत्महत्या केली. त्यांनीही त्यांची सुसाईड नोट फेसबुकवर पोस्ट केली होती. दोन्ही घटनांनी मन अस्वस्थ झालं आहे. आत्महत्येची भावना प्रबळ होत जाणं, आता जगण्यात काही राम नाही असं वाटणं, कुणाशी तरी बोलून त्यातून मार्ग काढून पुन्हा आयुष्य ताब्यात घ्यावंसं न वाटणं ही सगळीच आधुनिक जगण्याची देण आहे. या दोन्ही अत्यंत दुर्दैवी घटनांमधील आत्महत्येची कारणं हा वेगळा चर्चेचा मुद्दा आहे पण सोशल मिडिया अभ्यासक म्हणून सुसाईड नोट फेसबुकवर टाकणं, स्वतःच्या मनातली व्यथा, आत्महत्येचे विचार सोशल मिडियाच्या माध्यमातून जगापर्यंत पोचवणं ही मानसिकता काय आहे याचा शोध घेणं आवश्यक वाटतंय. त्यांच प्रमाणे अशा सुसाईड नोट्स ना लाईक करणाऱ्यांच्या मानसिकतेचा आणि सजग संवेदनशीलतेचा अभावाचा हा प्रकार नक्की काय आहे हेही जरा समजून घेणं त्यानिमित्ताने गरजेचं आहे. कारण जगभर हा ट्रेंड पसरतोय. आत्महत्या करण्याआधीचा व्हिडीओ युट्युबवरून व्हायरल करणं असो नाहीतरी सुसाईड नोट स्टेटस म्हणून टाकणं असो. आत्महत्यांचं प्रमाण तर वाढत आहेच पण त्यातली सोशल मिडियाची भूमिका दुर्लक्ष करण्याजोगती राहिलेली नाही.

सोशल मिडिया हे खुले व्यासपिठ आहे. तुमच्या मनात प्रत्येक क्षणी काय चालू आहे, अमुक तमुक भावना तुमच्या मनात निर्माण झाली कि लगेच ती सोशल मिडीयावर नोंदवली गेली पाहिजे, ही  या माध्यमाची गरज आहे. या गरजेवर या माध्यमाचं अर्थगणित चालत आणि माणसांच्या भावनांचंही. सोशल मिडियाचा विस्तार प्रचंड आहे. त्यांची व्हायरल व्हॅल्यू तुफान आहे. अशावेळी अनेकांपर्यंत पोचण्यातही या माध्यमाचा अर्थातच उपयोग केला जातो. ह्रितिक रोशनने त्याचे लग्नाचे नाते संपवताना सोशल मिडीयाचाच उपयोग केला होता. तसाच लोक आत्महत्येसाठी करतायेत. मुळात आत्महत्या करण्याची भावना जेव्हा तीव्र असते तेव्हा मनात प्रचंड निराशा, राग, फसवले गेल्याची भावना असते. सगळ्या गडद काळ्या भावनांनी मनात गर्दी केलेली असते. आपल्या आत्महत्येकच्या निर्णयाचं कारण जगाला कळलं पाहिजे ही  गरज असतेच. समाज माध्यमांमुळे ही गरज अधिक तीव्र झाली आहे. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आपल्यावर ही वेळ आली त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचीही भावना मनात असावी. ज्याने कुणी आपला छळ केलाय, ज्याने कुणी फसवले आहे त्याला कडक शासन व्हायला पाहिजे, तो/ती सुटता कामा नये याही भावना असतात बहुदा. म्हणूनच तपशिलाने आणि नावांसकट स्युसाईड नोट्स टाकल्या जातात. ‘फेसबुक डिप्रेशन’ नावाचा एक मानसिक आजार आता मानसोपचारतज्ञ अधोरेखित करू लागले आहेत. यात नैराश्यातून आत्महत्या करताना जसा सुसाईड नोट्ससाठी फेसबुकचा वापर होतो त्याचप्रमाणे फेसबुकच्या अतिरेकी वापराने आत्महत्येची भावना प्रबळ होत जाते असंही या विषयातले तज्ञ मानतात.

माणसांना एकमेकांशी जोडण्यासाठी तयार झालेल्या माध्यमाने माणसे एकमेकांपासून दुरावत चालली आहेत. ऑनलाईन जगतात हजारोने मित्रपरिवार असणाऱ्याला स्वतःच्या नैराश्याबद्दल बोलायला जवळच कुणी नसणं हि अतिशय गंभीर बाब आहे. सोशल मिडियावर रमताना आपण नक्की काय ‘मिस आऊट’ करतोय याचं भान सुटणं हि गंभीर गोष्ट आहे. नैराश्य ही आजची आपली सगळ्यात मोठी समस्या आहे. डब्ल्यूएचओ ने याच कारणासाठी हे वर्ष नैराश्याबद्दल बोलण्यासाठी, नैराश्याशी लढण्यासाठी डेडिकेट केलं आहे. आपल्या मनात नक्की काय चालू आहे याबाबत हलगर्जी असणं धोकादायक आहे. आत्महत्या हे कुठल्याच प्रश्नाचं  उत्तर नसतं हे आपल्याला माहित आहे, तरीही माणसं आत्महत्या करतायेत आणि त्याच प्रमाण वाढतंय.

मग प्रश्न पडतो, सोशल मिडियाचाच वापर करून आत्महत्या करू इच्छिणाऱ्या लोकांना त्या भावनेपासून आपण परावृत्त करू शकतो का? जसं जंक फूड आता आयुष्यातून डिलीट करता येणार नाही, तसाच सोशल मिडिया काढून टाकणं अशक्य आहे. पण मग या इतक्या प्रभावी माध्यमाचा वापर करता येईल का? काही तज्ञांच्या मतानुसार आत्महत्येचे विचार मांडणाऱ्या पोस्टचाच उपयोग लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी करता येऊ शकेल. 

Qntfy या हेल्थ अनॅलिटीक्स कंपनीचे सीईओ कॉपरस्मिथ यांच्यामते ऑनलाईन जगतात माणसे एकमेकांशी कोणत्या पद्धतीने कम्युनिकेशन करतात याची माहिती गोळा करून त्यातून काही ट्रेंड्स अधोरेखित करून आत्महत्येचे विचार करणाऱ्या लोकांपर्यंत पोचता येऊ शकत. माणसं ऑनलाईन कशापद्धतीने संवाद साधतात, त्यातून त्यांची व्यक्तिमत्व कशी आहेत याचे अंदाज बांधण्याचे तंत्रज्ञान आज विकसित आहे. त्याचा वापर ब्रॅण्ड्स पासून राजकीय पक्ष सगळेच घेत असतात. न्यूरो मार्केटिंग हे क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. या सगळ्याचा वापर सध्या भांडवलशाही व्यवस्थाना पूरक असा होतोय. पण याच सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानांचा, तंत्रज्ञानाच्या विकसित संकल्पनांचा वापर करून निराशेच्या गर्ते गेलेल्या, जाणाऱ्या माणसांना तिथून बाहेर काढता येऊ शकेल असा विश्वास शास्त्रज्ञाना वाटतोय.

आपण वापरकर्ते काय करू शकतो?

तर सोशल मिडियावरून एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी धडपडताना जरा प्रत्यक्ष वेळ द्यायलाही शिकलं पाहिजे. सोशल मिडियाच्या पलीकडे आयुष्य आहे, हे मेनी करून ते समृद्ध करण्यासाठी धडपडल पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, पोस्टना लाईक, लव्ह, sad, wow, वैगरे करताना आपण कशाला आणि कशासाठी करतोय याचं भान राखलंच पाहिजे. वाचलेल्या प्रत्येक पोस्टवर लाईक आणि तत्सम इमोटिकॉन टाकलेच पाहिजेत, प्रत्येक पोस्टवर लिहिलंच पाहिजे असं अजिबात नसतं. एखाद्या पोस्टवर काय प्रतिक्रिया द्यायची हे समज नाही तर काहीच नाही टाकलं तरी चालतं, पण स्युसाईड नोट्स आणि एखादा व्यक्ती गेल्याच्या पोस्टना लाईक करणं निव्व्ल मूर्खपणाच आहे. अनेकदा अशा पोस्टना लाईक करणाऱ्यांना आपण लाईक करतोय म्हणजे काय करतोय हेही लक्षात येत नाही. सवयीने लाईक ठोकणारेही अनेक असतात. सोशल मिडियावर वावरताना अशा सवयी आपल्याला लागल्या आहेत का याचा विचार केला पाहिजे. आणि त्या बदलल्या पाहिजेत. हे माध्यम भन्नाट आहे, आणि म्हणूनच ते वापरताना थोड्या सजगतेची गरज आहे.