शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

​यशोशिखर गाठताना...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2016 5:13 PM

आज प्रत्येकजण यश मिळविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करताना दिसतात, मात्र यश हे क्वचितच लोकांच्या पदरी पडते. नेमके असे का होते? प्रयत्न तर सर्वचजण करतात, मग यशाचे प्रमाण कमी का? ज्यांना यश मिळाले त्यांच्या नजरेत यश म्हणजे जे आपल्याला हवे ते मिळणे होय...

-Ravindra Moreआज प्रत्येकजण यश मिळविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करताना दिसतात, मात्र यश हे क्वचितच लोकांच्या पदरी पडते. नेमके असे का होते? प्रयत्न तर सर्वचजण करतात, मग यशाचे प्रमाण कमी का? ज्यांना यश मिळाले त्यांच्या नजरेत यश म्हणजे जे आपल्याला हवे ते मिळणे होय. यशाला मिळवून जे सुख आपल्याला मिळते ते अवर्णनीय असते. यश मिळविण्याच्या काही टिप्स असतात, ज्या आपणही आयुष्यात अंगिकारल्या तर यश हमखास मिळू शकते. आजच्या सदरात यशोशिखर गाठताना काय करायला हवे याविषयी जाणून घेऊया...आयुष्यात प्रत्येक कामाची निवड विचारपूर्वक, आपली बलस्थाने ओळखून आणि योग्यतेनुसारच निवडायला हवेत, आणि त्यांना पूर्ण केल्यानंतरच थांबा, मग ते पूर्ण करण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी थांबू नका. झोप, आळस, गप्पा-गोष्टी आदी सवयींना त्यागून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. बहानेबाजी किंवा टाळाटाळ करण्याची प्रवृत्ती मनुष्याला अकर्मण्य बनविते. प्रत्येक समस्येचे निराकरण करा, घाबरुन पलायन करु नका. अपयशामुळेच यशाचा मार्ग प्रशस्त होत असतो. मतिमंद मुलांना जर कलात्मक छंदाकडे प्रेरित केले तर त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास तीव्र गतीने होतो, हे संशोधकांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यांना मिळालेली नवी प्रेरणाच त्यांच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरते. म्हणून नेहमी सकारात्मक विचारसरणी धारण करावी, आशावादी रहावे, कारण नकारात्मक विचारसरणी मनुष्याला अपयशाकडे नेत असते.   आजच्या प्रगतीशील युगात अपंगदेखील मागे नाहीत. ते एखाद्या कलात्मक छंदाला अंगीकारुन आपल्या पायांवर उभे राहून आपल्या परिवारात आणि समाजात आत्मसन्मानाने जगू शकतात. फक्त गरज असते ती, आपली बलस्थाने ओळखून त्यात संपूर्ण ताकदीने एकजूट होण्याची. अशाच लोकांच्या सान्निध्यात राहा, जे आपल्यासारखेच महत्त्वाकांक्षी, परिश्रमी तसेच दृढ इच्छाशक्तीचे असतील. निराशावादी लोकांसोबत राहाल तर निराशाच पदरी पडेल. निराशा यशाच्या मागार्तील मोठा अडसर आहे. कोणत्याही कामात अपयश आल्यास नशिबाला दोष न देता पुन्हा नव्याने संपूर्ण शक्ती व निष्ठासोबत आपले ध्येय प्राप्तीसाठी जोमाने उभे राहा. आपले डोळे अर्जुनासारखे फक्त आपल्या ध्येयावर केंद्रित करा. आपला मूड नेहमी फ्रेश ठेवा. चांगली वेळ मूडच्या कारणाने थांबत नाही. यश मिळविण्यासाठी वेळेचे महत्त्व जाणा. एकापेक्षा जास्त ध्येय असतील तर प्राधान्यक्रमाने निश्चित करा आणि निष्ठेने ध्येयाकडे मार्गस्थ व्हा, यश नक्कीच मिळेल. आव्हानात्मक बदलांचा स्वीकार करा.* परिवर्तन ही जीवनाची वास्तविकता आहे. त्यामुळे त्याला आव्हान समजून प्रत्येक अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक परिवर्तन पुढे जाण्याचा मार्ग दाखवते अथवा ध्येयाजवळ पोहोचवते.* उदासीनतेचे मुख्य कारण म्हणजे आमच्या मनात अतार्किक इच्छा असतात. त्यांना स्वत:पासून दूर करा. इच्छा कमी केल्यास त्या पूर्ण करणे सोपे जाते.* परिस्थिती अनुकूल असल्यास तिचा फायदा घ्या. अनुकूल नसल्यास चिंता करू नका. एक संधी हातून गेल्यानंतर दुसºया संधीची वाट पाहा. मात्र, ती संधी दवडणार नाही याची काळजी घ्या.* यशस्वी लोक काहीही वेगळे करत नाहीत; पण ते वारंवार प्रयत्न करीत असतात. त्यात येणाºया अडचणींमध्येही ते पुढचे पाऊल अगोदर टाकतात. तसेच चुकीच्या निर्णयानंतरही समस्यांमधून समाधान शोधण्याचा प्रयत्न करीत असतात.* ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांची चिंता करू नये. अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, ज्या नियंत्रणात आणता येऊ शकतील. धैर्य ठेवल्यास चांगले परिणाम दिसून येतात.* समस्यांवर वारंवार चर्चा करून त्यातून मार्ग निघत नाही. नकारात्मकता मात्र निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहा आणि त्यातून सर्वांना सांगा. निराशेतूनही आशेचा किरण शोधण्याचा प्रयत्न करायला हवा.* एकदम ध्येयाकडे लक्ष न देता छोटे-छोटे ध्येय ठरवा. ते सहजगत्या मिळू शकेल आणि पुढे जाण्याची उर्मी वाढेल. ध्येयाच्या दिशेने रोज एक छोटे पाऊल टाकल्यास ते ध्येयाजवळ पोहोचवेल.* कोणत्याही लहानसहान मदतीसाठी इतरांची स्तुती केली पाहिजे. त्यातून स्वत:ला आनंद मिळू शकेल. तसेच छोटे यशही मोठे वाटू लागेल.* आपल्या भावनांना वाव देण्याचा प्रयत्न करायला हवा. दुसºयांना आनंदी करण्यासाठी मनातील गोष्ट सांगायला विसरू नका.