शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

आपल्या मुलांना नटवताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 5:54 PM

..पण लक्षात ठेवा, ती पावडर तुमच्या चिमुकल्यांसाठी वीषही ठरू शकते!

- मयूर पठाडेलहान मुलं, त्यातही मुली, किती क्यूट, गोड दिसतात ना! असंही लहान मुलांचं कोडकौतुक करण्यात आपल्याला शब्द पुरे पडत नाहीत आणि त्यांना नटवण्यात, सजवण्यातही आपण कुठलाच कद्रुपणा ठेवत नाही.. ही मुलं आहेत त्यापेक्षा आणखी सुंदर कशी दिसतील यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत असतो..या मुलामुलींचे पालक जाऊ द्या, अगदी शेजारपाजारचे आणि येणारे जाणारेही त्यांचे अगदी लाड करीत असतात, त्यांना अनेक गोष्टी आणून देत असतात. मुलींनाही नटायला आवडतंच. मग त्यासाठी पालकही त्यांना नवनवीन कपड्यांपासून तर मेकअपपर्यंत अनेक गोष्टींनी नटवत असतात. याच मेकअपमध्ये बऱ्याचदा असते ती चमचमणारी पावडर. ही पावडणर लावल्यावर मुलं दिसतातही आणखीच गोबरी, गोड...पण सावधान..

 

नुकत्याच झालेल्या एका पाहणीत आढळून आलं आहे, या पावडरमध्ये अनेकदा विषारी पदार्थही आढळून येतात. हे पदार्थ त्या मुलांच्या आरोग्यासाठी खूपच घातक असतात.किती?अगदी लहान आणि कुमारवयीन, त्यातही नऊ ते बारा या वयातील मुलांना या पावडरमुळे अकाली मृत्यूही येऊ शकतो. अर्थातच यात असलेल्या विषारी पदार्थांचा तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम होतो, त्यामुळे अगदी लगेच ही पावडर जीवघेणी ठरत नाही, पण वयाच्या अगदी तिशीत, चाळीशीतही तुम्हाला मृत्यू येऊ शकतो आणि त्याचं कारण ठरू शकते ही पावडर..‘जस्ट शाईन शिमर पावडर’ या नावानं अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या या पावडरवर त्यामुळे अनेक विक्रत्यांनी स्वत:हून बंदी घातली आहे आणि ही उत्पादनं आपल्या दुकानातून हद्दपार केली आहेत.ही तपासणी सरकारनं किंवा सरकारी संस्थेच्या पुढाकारातून झालेली नाही. कपड्यांचं एक पॉप्युलर स्टोअर आणि एक टीव्ही वाहिनी यांनी यासाठी पुढाकार घेतला. ही पावडर प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिल्यानंतर त्यात अत्यंत घातक असे विषारी घटक आढळून आले. या पावडरमध्ये काय आढळून आलं?

 

१- अ‍ॅसबेसटॉस हा अत्यंत घातक पदार्थ या पावडरमध्ये आढळून आला.२- याशिवाय बेरिअम, क्रोमिअम, शिसं, सेलेनिअम.. यासारखेही आरोग्यावर मोठा दुष्परिणाम करणारे पदार्थ या पावडरमध्ये होते.३- खास लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेली ही पावडर म्हणजे जणू एक जहाल वीषच आहे असं मत प्रयोगशाळेच्या संचालकांनी व्यक्त केलं.