Box Office Collection: विक्रांत मेस्सी देतोय सलमानला काटे की टक्कर; टायगर 3 च्या शर्यतीत '12वीं फेल' ची जोरदार कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 09:42 AM2023-11-17T09:42:01+5:302023-11-17T09:42:40+5:30

12th fail boxoffice collection: विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12 वी फेल' हा सिनेमा २७ ऑक्टोबर रोजी रिलीज झाला.

12th-fail-box-office-collection-day-21-starring-vikrant-massey-movie-earns-95-lakh-on-front-of-tiger-3-tsunami | Box Office Collection: विक्रांत मेस्सी देतोय सलमानला काटे की टक्कर; टायगर 3 च्या शर्यतीत '12वीं फेल' ची जोरदार कमाई

Box Office Collection: विक्रांत मेस्सी देतोय सलमानला काटे की टक्कर; टायगर 3 च्या शर्यतीत '12वीं फेल' ची जोरदार कमाई

बऱ्याचदा काही सिनेमा अत्यंत कमी बजेटमध्ये तयार केले जातात. मात्र, उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यांच्या जोरावर हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतात. असंच काहीसं सध्या विक्रांत मेस्सी याच्या '12 वी फेल' (12th Fail)  या सिनेमाविषयी घडताना दिसतंय. २१ दिवसांपूर्वी रिलीज झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. इतकंच नाही तर तो सलमानच्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमालाही तो कमाईमध्ये टक्कर देत आहे.

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित १२ वी फेल हा सिनेमा २७ ऑक्टोबर रोजी रिलीज झाला. या सिनेमासोबत कंगना रणौतचा 'तेजस' सिनेमाही प्रदर्शित झाला होता. मात्र, 'तेजस'ने काही दिवसांतच त्याचा गाशा गुंडाळला. परंतु, १२ वी फेल अद्यापही बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे.

विक्रांत मेस्सीच्या '12 वी फेल' या सिनेमाने २१ व्या दिवशी ९५ लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे साधारणपणे या सिनेमाने ५० कोटींची कमाई केली आहे.  या सिनेमाची फारशी कमाई जरी झाली नसली तरीदेखील त्यांनी सिनेमाचं बजेट वसूल केलं आहे. इतकंच नाही तर टायगर ३ गाजत असतानाच हा सिनेमा थिएटरमध्ये तग धरुन आहे. त्यामुळे विक्रांत मेस्सी सलमानला टक्कर देतोय असं म्हटलं जात आहे.

12 वी फेलच्या कमाईची आकडेवारी 

पहिला आठवडा- 13.04 कोटी रुपये
दुसरा आठवडा- 14.21 कोटी रुपये
तिसरा आठवडा- 9.3 कोटी रुपये
लाइफटाइम कलेक्शन- 36.55 कोटी रुपये
 

Web Title: 12th-fail-box-office-collection-day-21-starring-vikrant-massey-movie-earns-95-lakh-on-front-of-tiger-3-tsunami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.