#14YearsOnTheTop Trending: शाहरुख खानच्या 'पठाण'नं १४ वर्षांनंतर मोडला आमिर खानचा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 03:32 PM2023-02-09T15:32:33+5:302023-02-09T15:43:50+5:30

पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील आमिर खानचा १४ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. हा रेकॉर्ड मोडल्यानंतर सोशल मीडियावर #14YearsOnTheTop हा हॅशटॅग ट्रेंड करतो आहे.

#14YearsOnTheTopTrending: Shah Rukh Khan's 'Pathan' breaks Aamir Khan's record after 14 years | #14YearsOnTheTop Trending: शाहरुख खानच्या 'पठाण'नं १४ वर्षांनंतर मोडला आमिर खानचा रेकॉर्ड

#14YearsOnTheTop Trending: शाहरुख खानच्या 'पठाण'नं १४ वर्षांनंतर मोडला आमिर खानचा रेकॉर्ड

googlenewsNext

शाहरुख खान(Shahrukh Khan)चा चित्रपट पठाण (Pathaan) २५ जानेवारीला रिलीज झाला होता. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. इतकेच नाही तर एकानंतर एक विक्रम मोडीत काढत आहे. मात्र आता पठाणनं आमिर खान(Aamir Khan)चा बॉक्स ऑफिसवरचा १४ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. हा रेकॉर्ड मोडल्यानंतर आमिर खानचे चाहते १४ वर्षे बॉक्स ऑफिसवर टॉपमध्ये राहिल्याचा आनंद साजरा करत आहेत. यासोबतच सोशल मीडियावर #14YearsOnTheTop ट्रेंड होताना दिसत आहे.

आमिर खानचा बऱ्याच कालावधीपासून कोणताच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला नाही. मात्र असे असूनही आमिर खान बॉक्स ऑफिसवर मागील १४ वर्षांपासून टॉपवर होता. खरेतर आमिर खान गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतःचा रेकॉर्ड बनवत होता आणि तोच तोडत होता. जेव्हा आमिरचा गजनी रिलीज झाला होता तेव्हा कोणलाच एवढा अंदाज नव्हता की हा चित्रपट इतका सुपरहिट ठरेल. विशेष बाब म्हणजे गजनी सिनेमाचा रेकॉर्ड आमिरच्या ३ इडियट्सने मोडला होता.


२०१० साली चाहते आमिर खानची वाट बघत होते की तोच त्याचा रेकॉर्ड मोडेल. मात्र १४ वर्षानंतर आमिर खानचा हा रेकॉर्ड किंग खानच्या पठाणने मोडला आहे आणि बॉक्स ऑफिसचा किंग बनला आहे. असे असूनही सोशल मीडियावर चाहते आमिर खानने १४ वर्षे बॉक्स ऑफिसवर राज्य केले, ते साजरे करत आहेत.  

Web Title: #14YearsOnTheTopTrending: Shah Rukh Khan's 'Pathan' breaks Aamir Khan's record after 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.