अक्षय-रजनीच्या ‘2.0’ची ७०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 03:10 PM2018-12-14T15:10:41+5:302018-12-14T15:11:31+5:30
होय, गत २९ नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
अक्षय कुमार- रजनीकांत यांच्या ‘2.0’ या चित्रपटाने प्रेक्षकांना जणू वेड लावले आहे. बॉक्स ऑफिसवरचे या चित्रपटाच्या कमाईचे आकडे याचा पुरावा आहे. होय, गत २९ नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. रिलीजनंतरच्या दोन आठवड्यांत ‘2.0’ने ७०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. ७०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा ‘2.0’ हा कॉलिवूडच्या इतिहासातील पहिला चित्रपट आहे. ट्रेड अॅनालिस्ट मनोबल विजयबालन यांनी दिलेल्या आकड्यानुसार, ‘2.0’ने आत्तापर्यंत जगभरात ७१०.९८ कोटी रूपयांची कमाई केली आहे. केवळ तामिळनाडूत या सिनेमाने १६६. ९८ कोटींचा गल्ला जमवला आहे.
#2Point0 WW Box Office:
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 13, 2018
FIRST ever Kollywood film to CROSS ₹700 cr gross mark.
Week 1 - ₹ 526.86 cr
Week 2
Day 1 - ₹ 27.31 cr
Day 2 - ₹ 32.57 cr
Day 3 - ₹ 36.45 cr
Day 4 - ₹ 39.20 cr
Day 5 - ₹ 17.13 cr
Day 6 - ₹ 14.66 cr
Day 7 - ₹ 16.80 cr
Total - ₹ 710.98 cr
पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ५२६.८६ कोटी कमावले. दुसºया आठवड्याच्या पहिल्या दिवशी २७.३१ कोटी, दुस-या दिवशी ३२.५७ कोटी, तिस-या दिवशी ३६.४५ कोटी, चौथ्या दिवशी ३९.२० कोटी, पाचव्या दिवशी १७.१३ कोटी, सहाव्या व सातव्या दिवशी अनुक्रमे १४.६६ कोटी व १६.८० कोटी कमावलेत.
तिसºया आठवड्यातही ‘2.0’ची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड अशीच सुरू राहिल, असे मानले जात आहे. अमेरिकेत सुमारे १०० थिएटर्समध्ये चित्रपट सुरू आहे. तिस-या आठवड्यात एका भारतीय चित्रपटाने इतक्या दिवस अमेरिकन बॉक्स ऑफिसवर तग धरून राहणे, हाही एक विक्रम आहे. जाणकारांचे मानाल तर चित्रपटाचे लाईफटाईम कलेक्शन १००० कोटींवर असू शकते.
अक्षय व रजनीच्या या चित्रपटावर ६०० कोटी रूपये खर्च करण्यात आलेत. ही लागतही वसूल झाली आहे. प्री-बुकिंगच्या माध्यमातून प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाने कोट्यवधीचा गल्ला जमवला. या चित्रपटात अक्षय कुमार व रजनीकांत पहिल्यांदा एकत्र दिसलेत. चित्रपटात अक्षय क्रोमॅन बनला आहे तर रजनीकांत डबलरोलमध्ये आहे.