हृतिक रोशन नव्या वर्षांत करणार धमाका! साऊथच्या या दिग्दर्शकासोबत करणार काम!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 06:00 AM2019-01-04T06:00:00+5:302019-01-04T06:00:02+5:30
‘बँग बँग’, ‘मोहनजोदारो’ अशा बिग बजेट पण पुरत्या फ्लॉप चित्रपटांच्या ओझ्याखाली दबलेला हृतिक रोशन या वर्षांत मात्र धमाका करणार, असे दिसतेय. लवकरच हृतिकचा ‘सुपर 30’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय आणखी एक धमाकेदार चित्रपट हृतिकच्या झोळीत पडला आहे.
‘बँग बँग’, ‘मोहनजोदारो’ अशा बिग बजेट पण पुरत्या फ्लॉप चित्रपटांच्या ओझ्याखाली दबलेला हृतिक रोशन या वर्षांत मात्र धमाका करणार, असे दिसतेय. लवकरच हृतिकचा ‘सुपर 30’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय आणखी एक धमाकेदार चित्रपट हृतिकच्या झोळीत पडला आहे. होय, साऊथचे सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शक एस शंकर यांचा चित्रपट हृतिकने साईन केला आहे. एस. शंकर यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही.
नुकताच एस. शंकर दिग्दर्शित ‘2.0’ रिलीज झाला. या चित्रपटातील रजनीकांत व अक्षय कुमार यांच्या जोडीने बॉक्सआॅफिसवर अक्षरश: धूम केली. यापूर्वी शंकर यांनी रजनीकांत यांच्यासोबत ‘शिवाजी’ व ‘रोबोट’ यासारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘2.0’साठी शंकर यांनी बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार याची निवड केली. आता मात्र आपल्या आगामी चित्रपटासाठी त्यांनी हृतिकला पसंती दिली आहे. एस शंकर व हृतिकच्या जोडीचा हा चित्रपट एक सायन्स फ्रिक्शन थ्रीलरपट असणार आहे. हिंदीशिवाय तामिळ व तेलगू भाषेतही हा चित्रपट बनवला जाणार आहे. चित्रपटाची कथा खुद्द एस. शंकर लिहित आहेत. चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात हृतिकशिवाय बॉलिवूडच्या अन्य अनेक कलाकारांचीही वर्णी लागणार आहे. साऊथ इंडस्ट्रीचे चेहरेही यात दिसतील. हा एक सुपरहिरो चित्रपट असल्याचे कळतेय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एस. शंकर सुरुवातीपासूनचं आपल्या सुपरहिरो चित्रपटात हृतिकला घेऊ इच्छित होते. ‘2.0’साठीही शंकर यांना हृतिकचं हवा होता. पण त्यावेळी हृतिक आपल्या ‘सुपर 30’ मध्ये बिझी होता.
ऋतिक रोशनचा ‘सुपर 30’बाबत बोलायचे झाले तर हा सिनेमा आनंद कुमार यांचा बायोपिक म्हणून तयार करण्यात येणार होता. मात्र आता तो बायोपिक म्हणून नाही तर एक प्रेरणादायी कथेच्या स्वरुपात तयार करण्यात येणार आहे. आनंद कुमार बिहारात ‘सुपर 30’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.