2.0 Trailer: अक्षय कुमारने फॅन्सना दिले दिवाळीचे हे गिफ्ट, यादिवशी होणार 2.0चा ट्रेलर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:09 PM2018-10-29T17:09:25+5:302018-10-29T17:13:05+5:30
अक्षय कुमारकडून त्याच्या फॅन्सना दीवाळी गिफ्ट देण्यात आले आहे. अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा मच अवेटेड चित्रपट 'रोबोट 2.0'चा ट्रेलर दिवाळीत रिलीज होणार आहे.
अक्षय कुमारकडून त्याच्या फॅन्सना दीवाळी गिफ्ट देण्यात आले आहे. अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा मच अवेटेड चित्रपट 'रोबोट 2.0'चा ट्रेलर दिवाळीत रिलीज होणार आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावरुन ही माहिती त्याच्या फॅन्सना दिली आहे.
The FIFTH FORCE is coming!
— Akshay Kumar (@akshaykumar) October 28, 2018
Gear up, #2Point0Trailer launching on 3rd November! @2Point0movie@DharmaMovies@LycaProductions#2Point0#2Point0TrailerOnNov3pic.twitter.com/MFL6NMnwfE
सोशल मीडियावर अक्षय कुमारने एक फोटो शेअर केला आहे यात ट्रेलरची लाँचच्या डेटची घोषणा केली आहे. रोबोट 2.0चा ट्रेलर 3 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 29 नोव्हेंबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार यात ऐश्वर्या राय बच्चनचा केमिओसुद्धा आहे. या चित्रपटात अक्षय नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच तो खलनायकाच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामूळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. यातील व्हिएफएक्स इफेक्टवर थोडे थोडके नाही तर ५४४ कोटी रूपये खर्च केले गेले आहेत. विशेष म्हणजे, ही माहिती खुद्द अक्षय कुमारने आपल्या सोशल अकाऊंटवर दिली आहे. चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर ५४४ कोटी रूपये खर्च झालेत. चित्रपट बनवण्यासाठी ३ हजारांवर टेक्निशियनची मदत घेतली गेली आहे. निश्चितपणे भारतीय चित्रपटांच्या इतिहासात हा एक व्रिकम आहे. आजपर्यंत कुठल्याही चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर इतका खर्च केला गेलेला नाही. त्यामुळे ‘2.0’ या चित्रपटाला भारतातील सर्वात महागडा चित्रपट म्हणणे गैर होणार नाही. हा संपूर्ण चित्रपट ३-डीमध्ये शूट केला गेला. हेही भारतात पहिल्यांदाच झाले आहे. तामिळ आणि हिंदीमध्ये हा चित्रपट रिलीज होईल. यानंतर १३ अन्य भाषांत तो डब केला जाईल.